Anushka Sharma's story on Maharashtriyan food crawing all
Anushka Sharma's story on Maharashtriyan food crawing all esakal
मनोरंजन

अनुष्काच्या जेवणाची थाळ बघून तोंडाला सुटेल पाणी... केळीच्या पानावर महाराष्ट्रीय जेवण

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला विविध पद्धतीच्या खानपानाचा नाद आहे.तिला वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे पदार्थ खाण्यास आवडतात.(Anushka Sharma)तिचा ब्रेकफास्ट मिल असो व जेवणाची थाळ तिला विविध पाककृतींत बनलेले पदार्थ चाखायला आवडतात.दाक्षिण्यात्य भागातील पदार्थ असो वा मग थायलंड फूड,जेवणाचा प्रत्येक पदार्थ तिच्यासाठी प्रिय.कुठल्याही पदार्थाचा आस्वाद ती आनंदाने घेते.

अलीकडे तिने तिच्या इंस्टाग्राम(Instagram) अकाऊंटला महाराष्ट्रीय जेवणाची थाळी तिच्या स्टोरीला टाकलेली होती.ज्यामध्ये केळीच्या पानावर खास महाराष्ट्रीय जेवण दिसून येतं.मसाले भात,चण्याची भाजी,करी,वरण-भात या पदार्थांचा समावेश त्यात होता.'टाईम फॉर फूड'असे कॅप्शन देत तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला केळीच्या पानावरील महाराष्ट्रीय पदार्थ वाढलेली थाळी टाकत 'द मराठी पंगत' ला टॅग केले आहे.'थट्टू दोसा' हा दक्षिणेकडील प्रसिद्ध पदार्थ असून अनुष्काचा आवडता पदार्थ आहे.

महिन्याभरापूर्वी अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामन अकाऊंटला एक व्हिडीओ अपलोड केला होता.(Food Blog)ज्यामधे ती घरच्या बागेतील टमाट्यांनी जॅम बनवताना दिसतेय.या व्हिडीओमधे अनुष्काने घरघुती टोमॅटो जॅम कसे बनवले त्याची कृती युजर्सला दाखवली आहे.'अनुष्का बागेतून टमाटे तोडून आणत,त्यांना पाण्याने धुवत,त्याचे साल काढत,त्याला गरम पाण्यात उकळवतेय. त्यानंतर ती थंडगार बर्फाच्या पाण्यात ठेवत नंतर काही वेळाने त्यात साखर,मीठ,तिखट घालत गॅसवर जॅम बनवतेय.नंतर तिने बनवलेल्या जॅमचा आस्वाद कुटुंबासोबत घेताना ती व्हिडिओमधे दिसून येते.हा व्हिडीओ तिने २०२० च्या लॉकडाऊनच्या काळात बनवला होता.(Food Recipe)

अनुष्काला दाक्षिण्यात्य पदार्थ आवडतात.एकदा तिने साध्या केळीच्या पानावर 'थट्टू दोसा'या पदार्थाचा आस्वाद घेतला होता त्यासोबत फ्लॉवर करीसुद्धा होती.शेवग्याच्या शेंगांची भाजी ही बनवण्यात आली होती आणि सोबत केळीच्या पानांत केळीचे काप होते. तेव्हापासून अनुष्काचा 'थट्टू दोसा' आवडीचा पदार्थ आहे.अनुष्काने या फोटोला कॅप्शन दिले आहे, “स्वादिष्ट”.

अनुष्काच्या खाद्यपदार्थाची रेसीपी असो वा मग तिने अपलोड केलेली जेवणाची थाळ....नेटकरी तिच्या पोस्टला प्रतिक्रिया देण्यास कायम उत्सुक असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT