Ranveer Singh 
मनोरंजन

Ranveer Singh: अपवित्र रिश्ता! पॉर्नस्टार जॉनी सिन्सला रणवीर सिंगने दिली कोणती गोळी? ॲडवरून नेटकरी घालतायत राडा

Ranveer Singh: सध्या रणवीर एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीत रणवीर आणि पॉर्नस्टार जॉनी सिन्स (Johnny Sins) हे दोघे एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत.

priyanka kulkarni

Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. रणवीर हा त्याच्या बोल्ड आणि बिंधास्त स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. रणवीरचं न्यूड फोटोशूट हे चर्चेचा विषय ठरलं होतं. आता रणवीर त्याच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीत रणवीर आणि पॉर्नस्टार जॉनी सिन्स (Johnny Sins) हे दोघे एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. रणवीर आणि जॉनी यांची ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावरल्या तर काहींनी रणवीरचं कौतुक केलं.

रणवीर आणि जॉनी सिन्सची जाहिरात

रणवीर आणि जॉनी सिन्स या दोघांनी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ रणवीरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका सिरीयलचा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये रणवीर हा एका प्रोडक्टची माहिती देताना दिसत आहे. हे प्रोडक्ट मेन्स सेक्शुअल हेल्थचे आहे. रणवीर आणि जॉनी सिन्स यांच्या या जाहिरातीवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तन्मय भट्ट, अर्जुन कपूर, सॉन्ग क्रिएटर यशराज मुखाटे यांसारख्या सेलिब्रिटींनी रणवीर आणि जॉनी यांच्या या जाहिरातीवर कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या जाहिरातीला कमेंट केली, "भाई, ये क्या देख लिया", तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "जॉनी भैय्या फस गए डेली सोप के चक्क मैं"

पाहा व्हिडीओ:

रणवीरचे चित्रपट

रणवीर हा गेल्या वर्षी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता रणवीर हा डॉन 3 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असं म्हटलं जात आहे. रणवीरच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT