aparna kanekar passed away at the age of 83 saath nibhaya saathiya grandmother SAKAL
मनोरंजन

Aparna Kanekar: साथ निभाना साथिया फेम 'जानकी बा' कालवश! वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अपर्णा काणेकर यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालंय

Devendra Jadhav

Aparna Kanekar Passed Away News: ज्येष्ठ अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचं ८३ व्या वर्षी दुःखद निधन झालंय. साथ निभाया साथिया मधील सर्वांची लाडकी आजी काळाच्या पडद्याआड गेलीय.

साथ निभाया साथिया मध्ये जानकी बाच्या भुमिकेमुळे अपर्णा काणेकर लोकप्रिय झाल्या. 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या संपूर्ण कलाकारांना निधनामुळे मोठा धक्का बसला आहे.

२०११ मध्ये अपर्णा यांनी साथ निभाया साथिया मालिकेत ज्योत्स्ना कार्येकर यांची जागा घेतली. आणि जानकी बा मोदी म्हणून त्या घराघरात लोकप्रिय झाल्या. तब्बल ५ वर्ष त्यांनी ही भुमिका केली. ज्यासाठी त्यांना चाहत्यांचे अपार प्रेम मिळाले.

अपर्णा यांच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही. मात्र अपर्णा काणेकर यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे. (Latest Entertainment News)

'साथ निभाना साथिया'च्या कलाकारांनी त्यांच्या शोमधील लाडका सदस्य गमावल्याने शोक व्यक्त केलाय.

शोमध्ये परिधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री लवी सासन हिने चाहत्यांना तिच्या निधनाची माहिती दिली. तिने अपर्णा यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करुन हळहळ व्यक्त केलीय.

अपर्णा यांनी संजय दत्तच्या भुमी याशिवाय गंगुबाई, स्पर्श अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये भुमिका साकारल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT