Actress Aparna P Nair found dead aged 31 Esakal
मनोरंजन

Aparna P Nair Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू! घरात सापडला मृतदेह

Vaishali Patil

Actress Aparna P Nair found dead aged 31: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेक मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये दिसलेली अभिनेत्री अपर्णा पी. नायर ही करमना थाली येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचा बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

अपर्णा ही तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली.ती 31 वर्षांची होती. तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला.

गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपर्णा तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली. आई आणि तिची बहीण तिच्या मृत्यूच्या वेळी उपस्थित होते. त्यानंतर तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला. तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनीही तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे

अपर्णाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी तिच्या मृत्यूची बातमी पोलिसांना मिळताच त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिस अपर्णाचे मित्र आणि नातेवाईकांचे जबाब घेतले आहेत. अपर्णाचे लग्न संजीथ शी झाले होते. अपर्णाला थ्राया आणि कृतिका या दोन मुली आहेत.

ही अभिनेत्री मेघातीर्थम, "मुधुगव", "मिथिली वेंडम वरुणू", "आचायंस", "नीरंजना पुक्कल", "देवस्पर्शम" यासह बऱ्याच मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. 'चंदनामाझा' आणि 'आत्मसाखी' यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिकांसाठीही अपर्णा प्रसिद्ध होती.

तिने तिच्या मृत्यूच्या काही तास आधी तिने इंस्टाग्रामवर तिच्या धाकट्या मुलीचा एक फोटो व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या निधनाने तिच्या कुटूंबियांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT