Appi Amchi Collector latest update appi became a collector zee marathi serial
Appi Amchi Collector latest update appi became a collector zee marathi serial sakal
मनोरंजन

Appi Amchi Collector: अखेर अप्पी कलेक्टर झालीच! पण... असा असेल महाएपिसोड!

नीलेश अडसूळ

Appi Amchi Collector latest update : झी मराठी वरील ''अप्पी आमची कलेक्टर..'' या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. आप्पी तिचं कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करणार असून नुकतीच ती परीक्षा उत्तीर्ण झाली. अत्यंत हालकीच्या परिस्थितीतून वाट काढत अप्पीने हे यश मिळवलं आहे.

अगदी सासरी गेल्यावर तर तिला अभ्यास करणं ही शक्य नव्हतं पण तिने चिकाटीने हे करून दाखवलं. अगदी शेवटच्या क्षणी तिचे वडील मृत्यूच्या दारात असताना तिला परीक्षेला जावे लागले पण तिने मागे हटली नाही. पण आता मालिका खरी उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

(Appi Amchi Collector latest update appi became a collector zee marathi serial)

आपण ११ आणि १२ एप्रिलच्या भागात पाहिलं अप्पीचा interview जेष्ठ विशेष सरकारी वकील 'उज्वल निकम' आणि लेखक आणि IAS ऑफिसर 'विश्वास पाटील' यांनी घेतला, या मालिकेच्या निमित्ताने हे दोन ऑफिसर्स टेलीव्हिजनवर प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसले.

नुकताच एक प्रोमो समोर आला ज्यामध्ये अप्पी कलेक्टर झाल्याचं दिसणार आहे. येत्या रविवारी महाएपिसोडमध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यानिमित्ताने अर्जुन, छकुली, दिप्या आणि सर्व गावकरी मिळून अप्पीची मिरवणूक काढणार आहेत. मोठा सोहळाच गावामध्ये होणार आहे. विशेष म्हणजे ज्यांनी अप्पीला त्रास दिला ते सरकार आणि सुजय देखील तिचे कौतुक करताना दिसणार आहे.

पण हे दिव्य तिच्यासाठी काही सोप्पं नाही. अत्यंत प्रामाणिक असलेली अप्पी कलेक्टर झाल्यावर संसार आणि काम कसं पाहणार हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे. शिवाय कायम भ्रष्टाचारावर कडाडणारी अप्पी स्वतःच्या नवऱ्याला भ्रष्टाचार करताना पाहून तिची काय अवस्था होईल, ती त्याला माफ करेल का अशी बरीच आव्हानं अप्पीच्या वाट्याला येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT