apruna nemlekar and kiran mane dispute in Bigg Boss Marathi 4  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: माझा राग माझ्यावर असुदे.. अपूर्वाने किरण मानेचे उपटले कान..

आज रंगणार कॅप्टनसी कार्य, अपूर्वा - किरणमध्ये मोठा वाद..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi: बिग बॉस मराठीच्या खेळाला आता 70 दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे शेवटच्या एका महिन्यात स्वतः घरात टिकवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. अगदी अटीतटीचा सामना यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे वाद , भांडण आणि राडा हे सुरूच आहे. पण आज घरात अभिनेता पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी येणार आहे. त्यांच्या उपस्थितीच कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. यावेळी किरण आणि अपूर्वामध्ये चांगलीच बाचाबाची होताना दिसणार आहे.

(apruna nemlekar and kiran mane dispute in Bigg Boss Marathi 4 )

आज सोनाली आणि पुष्कर घरातील सदस्यांवर सोपवणार आहेत "चैन पडेना आम्हांला" हे कॅप्टन्सी कार्य. आता यात कोण बाजी मारणार ? आणि कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? कि हे कार्य देखील सदस्य रद्द करणार ? हे आजच्या भागात कळेलच. पण यामध्ये राडा होणार ही निश्चित..

या कार्य दरम्यान अपूर्व आणि किरण मध्ये जरा मतभेद होणार आहेत. आजच्या भागात दिसेल की, अपूर्वा किरणला म्हणते, 'मला इतकंच कळतं तुझ्या माझ्यात कितीही वाद झाला तरी तू जेव्हा जेव्हा कॅप्टन्सीसाठी उभा राहिला आहे किंवा जेव्हा तू खेळायला जातो ना तेव्हा तेव्हा मी आणि अक्षय तुझ्यासाठी उभे राहतो. तसंच तूही माझ्यावरचा राग आहे ना तो माझ्यावर राहू दे.

tyavar

त्यावर किरण म्हणतो, 'तुझ्यावर राग नाही माझा. अपूर्वा म्हणाली, जेव्हा मी खेळत असते ना मला कुठंलाही सदस्य Cheer Up करत नाही.. हे मी पहिल्या दिवसापासून पाहिलं आहे. पण जेव्हा अक्षय खेळतो तेव्हा अख्ख घर त्याच्या विरुध्द्व खेळतं... तुझ्याकडून मला हि अपेक्षा नाही, बाकी मला काही म्हणायचं नाही. चूक तुझी नाही माझी आहे कि मी अपेक्षा करते. मी काही फोर्स नाही करू शकतं. फक्त माझा राग माझ्यावर असुदे.' असं अपूर्वा किरणला सुनावते. आता खेळात नेमकं काय होतंय ते कळेलच..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातील शिलेदार उद्धव ठाकरेंनी फोडले, ठाण्यातील शिवसैनिकांचा ठाकरे सेनेत प्रवेश

Seed: भारतीय बीज सहकारी समिती २०३३ पर्यंत जगातील टॉप ५ बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचा निर्धार; मुरलीधर मोहोळ

Latest Marathi News Live Update : ठाण्यात कायद्याचा धाक उरला आहे का?

Mamata Banerjee: १४ वर्षांत तृणमूल सरकारचा रोजगारनिर्मितीचा दिग्गज आकडा: २ कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार, ममता बॅनर्जीचा दावा

MPSC Success Story:'दैवशाला शिंदे-गुंड यांची उपशिक्षणाधिकारीपदाला गवसणी'; शाळेतील लेकरांना शिकवत जिद्दीच्या जाेरावर मिळवलं सुयश..

SCROLL FOR NEXT