apurva nemlekar and akshay kelkar fight in Bigg Boss Marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: हे व्हायचच होतं! अक्षय अपूर्वामध्ये जोरदार भांडण..

बिग बॉस मराठीच्या घरात जिवलग मित्र म्हणवणाऱ्या अक्षय केळकेर आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात खडाजंगी!

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. 80 हून अधिक दिवस घरात एकत्र राहिलेले ही सदस्य काही दिवसातच बिग बॉसचा खेळ जिंकून आपल्या घरी जाणार आहेत. या 80 दिवसात बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांनी अनेक राडे, वाद, भांडणं पाहिली. अगदी किरण- विकास सारखे मित्र एकमेकांच्या कट्टर विरोधात जातानाही पाहिले. पण बिग बॉसच्या घरात अशी एक जोडी आहे जी शेवटपर्यंत एकत्र राहील असे प्रेक्षकांना वाटत होते. आणि त्यांच्यातही आता मोठी खडाजंगी झाली आहे.

(apurva nemlekar and akshay kelkar fight in Bigg Boss Marathi 4)

बिग बॉस च्या घरात सर्वात हुशार आणि क्रमांक 1 चा खेळाडू म्हणून अक्षयची ओळख झाली आहे. तर कुणालाही न बधणारी, तोडीस तोड उत्तर देणारी आणि आपल्या आवाजाने घर दणाणून सोडणारी अशी अपूर्वा नेमळेकर आहे. विशेष म्हणजे या दोघांची अगदी घट्ट मैत्री आहे. त्यामुळे या जोडीच्या सहसा कुणी वाटेला जात नाही. सगळेच त्यांना दबकून असतात. अख्ख घर एकमेकांशी भांडलं तरी ते दोघे उत्तम पद्धतीने न भांडता चर्चेतून प्रश्न सोडवतात. त्यांच्या मैत्रीचे दाखले स्वतः मांजरेकर देतात. अशा या जोडीमध्ये आता तब्बल 80 दिवसांनी फुट पडली आहे.

नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. यामध्ये अपूर्वा आणि अक्षय मध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे. यामध्ये अक्षय अपूर्वाला म्हणतो, 'मी सतत तुझ्या मर्जीने नाही चालू शकत.. ' त्यावर अपूर्वा त्याला म्हणते, 'तुला आज झालय काय? असा का टोन लागलाय तुझा..' त्यावर अक्षय म्हणतो, 'मी तुझ्याशी चार वेळा बोलायला आलो.. तु बोलली का माझ्याशी..' मग अपूर्वा म्हणते, 'हा जर तुझा विचार असेल तर माझ्याशी नाही बोललास तरी चालेल.. मी का सतत तुझ्या मैत्रीची भीक मागू' त्यावर अक्षय म्हणतो.. 'ठीक आहे नको बोलूया..' या वादानंतर अपूर्वा म्हणजे 'ओके.. नको बोलूया'.. त्यावर अक्षयला राग अनावर होतो आणि तो म्हणतो, 'नेमळेकर तु एकनंबरची स्वार्थी आहेस..' आता हा वाद किती विकोपाला गेलाय ही आजच्या भागात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT