apurva nemlekar
apurva nemlekar 
मनोरंजन

'जिथे अण्णा नाईक, तिथे शेवंता...'; 'रात्रीस खेळ चाले ३'बाबत अपूर्वा नेमळेकरचा खुलासा

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या दोन भागांनंतर आता बहुचर्चित तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २२ मार्चपासून ही मालिका प्रसारित होणार असून यातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेते माधव अभ्यंकर साकारत असलेल्या अण्णा नाईकांचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पण आता या तिसऱ्या भागात त्यांच्यासोबत शेवंता दिसणार का, याची उत्सुकता चाहत्यांना होती. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने याबाबत नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केली आहे. "जिथे अण्णा नाईक असेल, तिथे शेवंता येणारच", असं म्हणत तिने मालिकेतील तिच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला आहे. 

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा म्हणाली, "पडद्यावर पुन्हा एकदा शेवंता साकारण्यासाठी मी फारच उत्सुक आहे. मला या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालंय. त्यामुळे या मालिकेच्या तिसऱ्या भागात पुन्हा येणं माझ्यासाठी फारच आनंददायी आहे. मला अनेकांचे मेसेज येत होते. त्या सर्वांना आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की, अण्णा-शेवंता ही जोडी मालिकेत पुन्हा एकत्र येणार आहे. या दोघांना ठराविक कारणास्तव एकत्र यावंच लागणार आहे."

या मालिकेच्या टीझर व्हिडीओंना सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतोय. जवळपास वर्षभरानंतर या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेचा पहिला भाग प्रचंड लोकप्रिय झाला होता. या मालिकेचा दुसरा भाग प्रीक्वेलच्या रुपात प्रसारित झाला होता. आता तिसऱ्या भागातही प्रेक्षकांना गूढ, रहस्यमयी कथा पाहायला मिळणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT