AR Rahman Chennai Concert bad experience Angry Fans SLAM Organisers For Mismanagement  SAKAL
मनोरंजन

AR Rahman Concert: प्रचंड गर्दीने श्वास गुदमरला, रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये ढिसाळ नियोजनाने झाली चेंगराचेंगरी

चेन्नईमध्ये ए आर रेहमानचा कॉन्सर्टमध्ये सामान्य माणसांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं

Devendra Jadhav

ऑस्कर-विजेता संगीतकार ए.आर. रहमानचे चेन्नई मध्ये नुकताच कॉन्सर्ट झाला. यावेळी ढिसाळ नियोजनाचा रेहमानच्या फॅन्सना मोठा फटका बसल्याचे दिसुन आले.

Marakkuma Nenjam या नावाने ओळखला जाणाऱ्या रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये अतिशय खराब व्यवस्थापन असल्याने त्याचे चाहते निराश झाले आहेत.

रविवारी हजारो ए आर रहमानच्या चाहत्यांनी चेन्नई शहराच्या बाहेरील भागात झालेल्या मैफिलीला हजेरी लावली. परंतु या कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

तिकीट असुनही अनेकांना कॉन्सर्टमध्ये प्रवेश मिळाला नाही

म्युझिक मेस्ट्रो रेहमानला स्टेजवर याची देही याची डोळा लाईव्ह पाहण्यासाठी त्याच्या साक्षीदार उत्साही चाहत्यांनी कार्यक्रमस्थळाबाहेर रांगा लावल्या होत्या.

पण कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेली खराब व्यवस्था बघून अनेक चाहत्यांनी एक्स वर तक्रारी केल्या. रेहमानच्या कॉन्सर्टला असलेली जागा ओव्हरबुक झाल्याचे उघड केले. अपेक्षेपेक्षा जास्त माणसं कॉन्सर्टला सहभागी होती. याशिवाय अनेकांना मैफिलीच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी देखील दिली नाही. तिकीट असुनही काही चाहत्यांना प्रवेश मिळाला नाही.

मारामारी, चेंगराचेंगरी अन् गोंधळ

ए. आर. रेहमानच्या नाराज चाहत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. हे शेयर करत असतानाचा भयानक गैर व्यवस्थापनासाठी रेहमानच्या टीमला फटकारले.

चाहत्यांनी खचाखच भरलेल्या एंट्री गेट्सच्या व्हिडिओसह X वरील एका वापरकर्त्याने पोस्ट केले, “2000 रुपयांची तिकिटे काढूनही AR रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये प्रवेश मिळाला नाहीत. प्रचंड विश्वासघात झाला. आजूबाजूला चाललेल्या मारामारी आणि गोंधळामुळे ताण वाटत होता! कॉन्सर्टचा आवाज पण नीट ऐकू येत नव्हता!"

आता रेहमान या सर्व प्रकरणावर काय बोलणार, तो फॅन्सना झालेल्या मनस्तापाची दखल घेणार का, हे पाहायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT