AR Rahman big revelation about the industry Singer esakal
मनोरंजन

AR Rahman: 'इंडस्ट्रीमध्ये माझा कुणीही मित्र नाही!' असं का म्हणाले ऑस्कर विजेते रहमान?

सध्या रहमान यांची एक मुलाखत सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

AR Rahman big revelation about the industry Singer : बॉलीवूडमध्ये रहमान यांच्या नावाची वेगळीच क्रेझ आहे. रहमान यांचे संगीत ज्या चित्रपटाला आहे त्या चित्रपटाची उंची आपोआप वाढते. प्रेक्षकांना त्या चित्रपटाची कमालीची उत्सुकता असते. ऑस्कर विजेत्या ए.आर.रहमान यांच्या मुलाखतीची सध्या चर्चा सुरु आहे. त्यात त्यांनी इंडस्ट्रीतील वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले आहे.

सध्या रहमान यांची एक मुलाखत सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या मुलाखतीमध्ये रहमान यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर मोकळेपणानं भाष्य केलं आहे. त्या मुलाखतीमध्ये रहमान यांना तुमचा इंडस्ट्रीमधील सर्वात जवळचा मित्र कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी माझा सगळ्यात जवळचा मित्र माझा ड्रायव्हर आहे. असे म्हटले आहे. तो नेहमीच माझ्यासोबत असतो.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

रहमान यांनी पुढे म्हटले की, मला जर वाटले की, माझ्या सांगण्यामुळे कुणावर दबाव येतो आहे तर मी त्याला काम करण्याचा आग्रह करत नाही. किंवा त्याच्यावर कोणतीही सक्ती करत नाही. मला मोकळेपणानं काम करायला आवडते. ज्याच्यात जे चांगले त्याचा मी आदर करतो. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी मी मुक्तपणे संवाद साधतो. कुणाला माझ्याकडे काम करायचे नाही त्यांनी बिनधास्त निघून जावे. त्याचा मला राग नाही.

एक गोष्ट खरी आहे की, माझ्याजवळ कुणी असं नाही ज्याला मी माझा मित्र म्हणू शकेल. माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. मी एकांतप्रिय आहे. मला शांतता आवडते. याबरोबरच मी माझ्या मुलांना कोणत्याही प्रकारे सल्ला देण्यास आग्रही नसतो. त्यांनी मी सांगितलेलं ऐकावे असेही मला वाटत नाही. माझी भूमिका फारच वेगळी आहे. तुम्हाला कुणावर सक्ती करता येत नाही. मी मुलांसमोर काही गोष्टी मांडतो. त्यांना जर त्या आवडल्या तर त्याचा ते विचार करतात.

आम्ही त्यावर मोकळेपणानं बोलतो. आणि मग एका निर्णयापर्यत पोहचतो. हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असे मला वाटते. मुलं मला त्यांना पुढे जे काही करायचे आहे त्याविषयी मला विचारतात. याचा आनंद आहे. अजूनही ते माझी परवानगी घेतात. त्यात मी त्यांना शक्य होईल ती मदत करत असतो.

वडीलांविषयी बोलताना रहमान भावूक झाल्याचे दिसून आले. त्यावेळी ते म्हणाले, मी जेव्हा जेव्हा माझ्या वडीलांबाबत विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी खूपच नशीबवान आहे की, मी त्यांचा मुलगा आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. संगीताचा वारसा मला त्यांनी दिला. यापेक्षा मोठा आनंद कोणता. अशा शब्दांत रहमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Nagpur Court: थकीत फीसाठी विद्यार्थिनीला शाळेतून काढणे बेकायदेशीर; उच्च न्यायालय, शिक्षणाचा अधिकार सर्वोच्च अधिकार असल्याचे निरीक्षण

लोकप्रिय अभिनेत्रीला मालिका सेटवर अपमानास्पद वागणूक; स्वत:च केला मोठा खुलासा!

Latest Marathi News Live Update : हिंमत असेल तर वाळू माफिया बंद करा!" ; एकनाथ खडसेंचं सरकारला थेट चॅलेंज

नवरा असावा तर असा! घरातील काम करताना दिसले अविनाश नारकर, Viral Video होताच कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT