ar rahman and lata mangeshkar sakal
मनोरंजन

तुमरे बिन हमरा कौनो नाहीं!

माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच हा अतिशय दुखःद दिवस आहे. लता दीदी केवळ एक गायिका किंवा केवळ एक आदर्श नव्हत्या, त्या आपल्या आत्म्याचा एक भाग होत्या.

सकाळ वृत्तसेवा

माझ्यासाठी आणि आपल्या सग ळ्यांसाठीच हा अतिशय दुखःद दिवस आहे. लता दीदी केवळ एक गायिका किंवा केवळ एक आदर्श नव्हत्या, त्या आपल्या आत्म्याचा एक भाग होत्या.

- ए. आर. रेहमान, प्रसिद्ध संगीतकार व गायक

माझ्यासाठी आणि आपल्या सग ळ्यांसाठीच हा अतिशय दुखःद दिवस आहे. लता दीदी केवळ एक गायिका किंवा केवळ एक आदर्श नव्हत्या, त्या आपल्या आत्म्याचा एक भाग होत्या. भारताचा, प्रत्येक भारतीयाचा, हिंदुस्तानी संगीताचा, हिंदी काव्य क्षेत्राचा, उर्दू, बंगाली आणि त्यासह ज्या ज्या भाषांमध्ये त्या गायल्या, त्या प्रत्येकाचा लता दीदी अविभाज्य भाग होता. त्यांच्या निधनाने या सर्वांमध्ये एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रत्येक सुराची तालीम!

माझे वडील त्यांच्या खोलीत लता दीदींचा एक फोटो कायम ठेवत असत. झोपेतून उठल्यावर त्या फोटोकडे बघून प्रेरणा घेऊन ते रेकॉर्डिंगला जायचे. ही माझी लता दीदींची पहिली आठवण. त्यांच्यासोबत मला काही गाणे रेकॉर्ड करता आले आणि त्यांच्यासह काही गाण्यांमध्ये सहगायक म्हणून काम करता आले, हे माझे भाग्यच. मी सुरुवातीला माझ्या गायनाकडे फार गंभीरपणे बघायचो नाही. माझे संगीतकार आणि वादक सर्व गोष्टींची व्यवस्था करत असल्याने मी फारसा सराव करत नसे. मात्र, ज्यावेळी मी पहिल्यांदा लता दीदींसाठी गाणे संगीतबद्ध केले, त्यावेळी आमची तालीम संपल्यावर त्यांना दुसऱ्या खोलीत जाऊन तालीम करताना पाहिले. त्यांच्या सहायकासह दीदी प्रत्येक शब्दाची, प्रत्येक सुराची काळजीपूर्वक तालीम करत होत्या. त्या एका घटनेने माझे आयुष्य बदलले. त्यानंतर मी माझ्या प्रत्येक तालमीआधी कसून सराव करू लागलो. ‘लगान’ या मी संगीत दिलेल्या चित्रपटातील ‘ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे...तुमरे बीन हमारा कौनो नहीं’ हे लता दीदींनी गायलेले अतुलनीय भजन माझ्या कायम स्मरणात राहील.

प्रभाव अतुलनीय

लता दीदींच्या निधनाने निश्चितच मोठी पोकळी निर्माण होणार आहे. त्यांच्या गाण्यांच्या रुपाने त्या आपल्यात कायमस्वरूपी राहणार असल्या, तरीदेखील देहरुपाने नसल्याची पोकळी भरून येणे अशक्य आहे. त्यांच्या आवाजाने, त्यांच्या संगीताने प्रेरणा मिळालेले हजारो गायक त्यांचा वारसा आपापल्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतीलच. मात्र, लता दीदी आणि मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे, शकील बदायुनी साहेब, नौशाद साहेब, एस. डी. बर्मन अशा अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या या पिढीने रचलेला पाया आणि संगीत क्षेत्रावर टाकलेला प्रभाव अतुलनीय आहे. हा वारसा जपण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. तीच लता दीदींना खरी आदरांजली असेल.

एक गाणे अकरा दिवस!

लता दीदी प्रत्येक गाण्यासाठी पुरेसा वेळ देऊन मेहनत घेत असत. एकदा त्या मला म्हणाल्या, ‘‘नौशाद साहेब आम्हाला एका गाण्याच्या सरावासाठी अकरा दिवस बोलवत असत.’’ तुम्हाला ते गाणं शिकण्यासाठी किती दिवस लागायचे, असे विचारले असता त्यांनी, ‘एकच दिवस लागत असे, पण तरी नौशाद साहेब अकरा दिवस बोलवत असत. त्यामुळे तुम्हाला गाण्याचा अर्थ खऱ्या अर्थाने कळत असे’, असे सांगितले. कुठलीही गोष्ट आत्मियतेने करणे, ती संपूर्णपणे आत्मसात करणे आणि कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवणे, हे त्यांचे गुण आजच्या तरुण पिढीने शिकणे गरजेचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT