AR Rahman's Son AR Ameen Escapes Major Accident On Set sakal
मनोरंजन

A. R. Ameen: थोडक्यात वाचला! ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा शूटिंगदरम्यान अपघात..

ए. आर. अमीननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा धक्कादायक अनुभव सांगितला.

नीलेश अडसूळ

A. R. Ameen accident : जगत विख्यात संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या मुलाबाबत म्हणजे ए. आर. आमिन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच एक चित्रीकरणा दरम्यान तो मोठ्या अपघातातून बचवला. काही क्षणाचा विलंब झाला म्हणून मोठा अनर्थ टळला. याबाबत त्याने स्वतः व्हिडिओ शेयर करत माहिती दिली आहे.

ए. आर. रहमान यांना आपण सगळे ओळखतोच. त्यांच्या गाण्याने अवघ्या जगाला भुरळ घातली आहे. ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. अमीन (A. R. Ameen) हा देखील संगीत क्षेत्रात कार्यरत असून स्वतःला सिद्ध करत आहे.

नुकतीच आमीनसोबत एक घटना घडली. आमीन हा एका सेटवर गाण्याचे शूटिंग करत होता. त्या शूटिंग सेटमध्ये क्रेनवर एक भलेमोठे झुंबर लावले होते. ते झुंबर अचानक कोसळले. आमीननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या संपूर्ण घटनेबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

 त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये क्रेनला लावलेलं झुंबर दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "मी माझे आई-वडील, कुटुंब, हितचिंतक आणि माझे गुरू यांचा आभारी आहे की, मी आज सुरक्षित आणि जिवंत आहे.'

''तीन दिवसांपूर्वी, मी एका गाण्याचे शूटिंग करत होतो आणि मी कॅमेर्‍यासमोर पाहत परफॉर्म करण्याकडे माझे पूर्ण लक्ष होते. तेथील टीम य=इतर व्यवस्थापन आणि सुरक्षेकडे लक्ष देईल, असा माझा विश्वास होता. मी स्टेजच्या अगदी मध्यभागी असताना क्रेनला लटकलेले झुंबर खाली कोसळले.''

'' मी जिथे थांबलो होतो आणि झुंबर जिथे पडले त्यामध्ये केवळ काही इंचाचा फरक होता. माझी टीम आणि मी शॉक झालो. अवघे काही अंतर हुकले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या आघातातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत." असं ए. आर. अमीननं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

अमीननं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. बोनी कपूर यांनी अमीनच्या पोस्टला कमेंट केली, 'तू खूप चांगला व्यक्ती आहेस, देव तुझे नेहमी रक्षण करेल.' तसेच अमीनची बहीण खतीजा रहमाननं कमेंट केली, 'आम्ही नेहमी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. काळजी घे.'  ए.आर. रहमान यांनी देखील अमीनच्या पोस्टला कमेंट केली. त्यानं कमेंट करत लिहिलं, 'चमत्कार, देवाची कृपा!' असं म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT