Arbaaz Khan Esakal
मनोरंजन

Arbaaz Khan: अरबाज खानने 57व्या वर्षी केलं दुसरं लग्न; सोशल मिडीयावर फोटो केले शेअर

बॉलिवूड अभिनेता अरबाझ खानने शूरा खानसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अभिनेत्री मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खानने ६ वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे. अरबाज खान आणि शूरा खान यांचा विवाह सोहळा बहीण अर्पिताच्या घरी हा सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात कुटुंबिय आणि काही जवळचे लोक सहभागी झाले होते.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान देखील लग्न सोहळ्याला उपस्थित होता. याशिवाय सलमान खान, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, बाबा सिद्दीकी, सलमा खान, हर्षदीप कौर, युलिया वंतूर यांनी देखील या लग्नाला हजेरी लावली.

दरम्यान खान आणि शूरा खान यांचा विवाह सोहळा 24 डिसेंबरला मुंबईत लग्न होणार असल्याचा दावा यापूर्वीच्या बातम्यांमध्ये करण्यात आला होता.

अरबाज आणि मलायका यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे. अरबाजसोबत घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत.

शूरा खानसोबत लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत आलेल्या अरबाज खानने अखेर 24 डिसेंबरला शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली. शूरा ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे. मुंबईतील अर्पिता खानच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला आणि या जोडप्याने त्यांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. अरबाज आणि शूराने त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

अशी झाली दोघांची भेट

शूरा मेकअप आर्टिस्ट आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्येही काम केले आहे. लव्हबर्ड्स अरबाज आणि शूरा अभिनेत्याच्या आगामी चित्रपट पटना शुक्लाच्या सेटवर भेटले. अरबाज स्वत: त्याच्या प्रोडक्शन बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये रवीना टंडन, मानव विज, चंदन रॉय सन्याल, जतिन गोस्वामी आणि अनुष्का कौशिक यांचा समावेश आहे. दिवंगत सतीश कौशिक देखील या चित्रपटाचा एक भाग होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Fire Kolhapur : स्मार्ट मीटरने अचानक घेतला पेट, कोल्हापुरातील कागलमधील घटना, महावितरणचा खुलासा

ऑक्टोबरमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार १५ एप्रिलची मतदार यादी

‘लाडकी बहीण’चे पोर्टल बंद! ६५ वर्षांनंतर लाडकी बहीणचा लाभ बंद, पण २१ वर्षे झालेल्या महिलांना करता येईना योजनेसाठी अर्ज; अपात्र महिलांकडून वसुली नाही, पण...

Pune News : गुलटेकडी परिसरात ठेकेदाराने संपविले जीवन

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

SCROLL FOR NEXT