Salman Khan Dance: Esakal
मनोरंजन

Salman Khan Dance: भावाच्या दुसऱ्या लग्नात भाईजानचे ठुमके! नव्या वहिनीसोबतचा डान्स व्हिडिओ व्हायरल

सध्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

Salman Khan Dance In Arbaaz Khan`s Wedding: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि शूरा खान यांनी 24 डिसेंबरला लग्न गाठ बांधली आहे. अरबाजच्या निकाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

सध्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यावर नेटकरी प्रतिक्रियाही देत आहेत. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले ज्यात एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतेल आहे.

अरबाज खानच्या आयुष्यातील या महत्वाच्या दिवशी त्याचे भाऊ सलमान खान आणि सोहेल खान, वडिल सलीम खान, आई सलमा खान आणि त्याचा मुलगा अरहान खान हे संपूर्ण खान कुटुंब अरबाजसोबत होते. अरबाज आणि शूरा खानच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान खान आणि अरबाजचा मुलगा लग्नात नाचताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खान दबंगमधील त्याच्या 'तेरे मस्त मस्त दो नैन' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबत अरहान खान, अलविरा खान अग्निहोत्री, शूरा खान हे देखील त्याच्यासोबत डान्स करताना दिसले.

त्यानंतर हर्षदीप कौरने 'दिल दिया गल्लन' गायले, तेव्हा सलमान, अरबाज खान आणि शुरा खान आणि अरबाजचा मुलगा अरहान खान या सर्वांनी परफॉर्मन्सचा आनंद घेत डान्स केला.

यावेळी सलमान खान ग्रे पठाणी सूटमध्ये दिसला तर अरहान खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होता.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत अरबाज खान आणि शुरा खान त्यांच्या लग्नाचा उत्सव साजरा करण्यासाठी केक कापला.

अरबाज खानने पहिल्यांदा मलायका अरोरासोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांचा 2016 ला घटस्फोट झाला. 11 मे 2017 रोजी दोघांनी अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केली होती. मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा मुलगा आहे. आता अरबाजने शुरासोबत दुसरे लग्न केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: पावसाचा हाहाकार! पुढील 5 दिवस काळजीचे... या जिल्ह्यांना रेड अलर्ट! मुंबई-पुण्याची परिस्थिती कशी असेल?

PM मोदी जगातले सर्वात लोकप्रिय नेते; ट्रम्प अन् मेलोनींच्या रँकिंगमध्ये घसरण; कोण कितव्या स्थानी?

Child End Of Life : शाळा का चुकवतोस आईनं विचारलं, मुलाने थेट गळफासचं घेतला; नेमकं काय चुकलं

Latest Maharashtra News Updates : कऱ्हाडजवळ आजपासून महामार्गावर एकेरी वाहतूक, उड्डाणपुलाचे गर्डर उतरविण्यासाठी नियोजन

Latur Crime: ‘एचआयव्ही’बाधित मुलीवर अत्याचार; चार महिन्यांनी गर्भपाताचा आरोप, सहा संशयितांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT