Arbaaz Khan marries Shura Khan:  Esakal
मनोरंजन

Arbaaz Khan marries Shura Khan: अरबाजची दुसरी बायको शूरा आहे तरी कोण? कशी जुळली रेशीम गाठ?

Arbaaz Khan marries makeup artist Shura Khan: अरबाजनं वयाच्या 57 व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत अधिकृतपणे लग्न केले आहे.

Vaishali Patil

Arbaaz Khan marries make-up artist Shura Khan:

सध्या सोशल मिडियावर फक्त अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा आहे. अरबाजनं वयाच्या 57 व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत अधिकृतपणे लग्न केले आहे.

24 डिसेंबर रोजी अर्पिता खानच्या घरी दोघांचा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्यात बी टाऊनचे बरेच स्टार्स सहभागी झाले होते. मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी अरबाजने पुन्हा दुसरे लग्न केले. ज्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहे शूरा?

शूरा खान बद्दल बोलायचे झाले तर ती व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे. तिने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही शोसाठी काम केले आहे. ती गायक तुलसी कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत काम केले आहे. तिने हे फोटोही शेयर केले आहेत. शूराचे तिच्या सोशल मीडिया हँडलवर 13.2 हजार फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री रवीना टंडननेही तिला फॉलो केले आहे. (Who is Shura?)

कशी झाली भेट..

अरबाज खान आणि शूरा खानची भेट त्याच्या पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. येथेच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर 24 डिसेंबरला दोघांनी लग्न गाठ बांधली. (How did both meet?

अरबाज खानने पहिल्यांदा मलायका अरोरासोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांचा 2016ला घटस्फोट झाला. 11 मे 2017 रोजी दोघांनी अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केली होती. मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा मुलगा आहे.

मलायकानंतर अरबाजने मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करायला सुरुवात केली. 2019 मध्ये त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले. मात्र हे नातेही जास्त काळ टिकले नाही.

अरबाजने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1996 मध्ये 'दरार'मधून केली होती, ज्यामध्ये त्याला त्याच्या खलनायकी भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. आता तो लवकरच 'पटना शुक्ला' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग 10 मध्ये आज मतदान

Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT