Arbaaz Khan Esakal
मनोरंजन

Arbaaz Khan: 'आजही तिला थेट फोन करुन..',घटस्फोटानंतरही अरबाज खान गाजवतोय मलायकावर हक्क!

सकाळ डिजिटल टीम

मलायका अरोरा आणि अरबाज खान हे त्याच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. 2017 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरबाज खान आणि मलायका यांना वेगळं होऊन 6 वर्षांहून काळ झाला आहे.

मात्र या दोघांना जोडणारा एक दुवा आहे तो म्हणजे त्यादोघांचा मुलगा अरहान खान. अनेकदा दोघेही त्यांचा मुलगा अरहानसोबत एकत्र शो करतात. मुलाला सोडण्यासाठी ते विमानतळावरही दिसतात. आता दोघेही त्याच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मलायका अर्जूनला तर अरबाज जॉर्जियाला डेट करत आहे. मात्र तरीही ते अनेकदा ट्रोल होतात. यात मलायकाला जास्त टिकेला सामोरं जावं लागतं.

मात्र यासंदर्भात अरबाजने आता काही महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे. जेव्हा अरबाज खानला विचारण्यात आले की, घटस्फोटानंतर माजी पत्नी मलायका अरोरासोबत दिसल्यामुळे अनेक वेळा लोक दोघांबद्दल नकारात्मक कमेंट करतात. तुम्ही फक्त दिखावा करतात असा आरोप केला जातो याबद्दल तुम्ही काय सांगाल तर यावर अरबाजनं उत्तर देत ट्रोलर्संची बोलतीच बंद केली.

यावर अरबाजने त्याच्याच शब्दात उत्तर दिले आणि म्हणाला, 'लोक काहीही बोलू शकतात आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही या सगळ्यालांना उत्तर देण्याचा विचारही करत नाही. खरं तर जग आपल्याबद्दल काय विचार करतं आणि लोक काय म्हणतात याबद्दल आम्हाला काहीही फरक पडत नाही. एखादा माणूस आपल्या माजी पत्नीशी बोलू शकत नाही का? मला यात काही नवलं वाटतं नाही.

घटस्फोट झाल्यानंतरही मलायका आणि अरबाज यांच्यात चांगले संबंध आहेत आणि ते त्यांचा मुलगा अरबाजचे उत्तम प्रकारे पालन करत आहेत. मलायका आणि अरबाज अनेकदा पार्ट्यांमध्ये आणि त्यांच्या मुलासोबत वेळ घालवताना दिसतात.

मलायका आणि अर्जूनच्या लग्नाच्या बातम्याही समोर आल्या होत्या मात्र मलायकाने या बातमीचे खंडन केले आणि ती सध्या रिलेशनशिपचा टप्पा एन्जॉय करत आहे. लग्नाबाबत ती सध्या काहीच बोलू शकत नाही. सध्या ते प्री-हनिमून पीरियडवर आहेत.असं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेचं आंदोलन बेकायदेशीर... अनेक अटींच उल्लंघन... हायकोर्टात काय घडलं? राज्य सरकारने मांडली बाजू

Karad News: 'मलकापूरला कंटेनर अडकल्‍याने वाहतूक कोंडी'; वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा

Live Breaking News Updates In Marathi: सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी

पन्हाळा तालुक्यात घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाकडून मेव्हण्यावर गोळीबार; दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग....'वर्षा' निवसस्थानी महत्त्वाची बैठक, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित, तोडगा निघणार?

SCROLL FOR NEXT