Nawazuddin Siddiqui As Haddi And Archana Puran Singh esakal
मनोरंजन

नवाजुद्दीनच्या 'हड्डी' लूकवर अर्चनाची प्रतिक्रिया; म्हणाली - माझे केस...

नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'हड्डी' या चित्रपटातील लूक सध्या चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Archana Puran Singh Reaction On Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'हड्डी' (Haddi) या चित्रपटातील लूक चर्चेत आहे. नवाजचा मेकओव्हर पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. तो अजिबात ओळखूही येत नाही. सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे लोक तिच्या लूकची तुलना अर्चना पूरण सिंगसोबत करत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्यामुळे बहुतेक कमेंटमध्ये तिची तुलना नवाजशी करण्यात आली आहे. ही गोष्ट अर्चनापर्यंत पोहोचल्यावर तिने यावर प्रतिक्रिया दिली.

म्हणाली - हा लूक कपिलच्या शोमधील

अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) स्वत:वरील प्रत्येक विनोद खेळाडू वृत्तीने घेते. हे चित्र कपिल शर्माच्या शोमध्येही ही पाहायला मिळाले आहे. आता लोक नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक तिच्यासारखा असल्याचे सांगत आहेत. यावर तिने उत्तर दिले आहे. अर्चनाने सांगितले की, हेअरस्टाइलमुळे लोक माझी तुलना त्याच्याशी करित आहेत.

द कपिल शर्मा शोच्या सुरुवातीला मी या साइड पार्टिंग लूकमध्ये दिसली होती. जेव्हा तिला विचारले की ही तुलना कशी वाटते? यावर तिने उत्तर दिले, मी एवढेच सांगू शकते की नवाजशी तुलना करणे ही एक मोठी प्रशंसा आहे.

चित्रपट २०२३ मध्ये होणार प्रदर्शित

हड्डीच्या मोशन पोस्टरमध्ये नवाज स्टाईलमध्ये गाऊन घातलेला दिसत आहे. त्याच्याजवळ लोखंडी रॉड ठेवण्यात आला आहे. रॉडसोबत हातावरही रक्त दिसत आहे. सदरील चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. तो २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या व्यक्तिरेखेचे ​​नावही हड्डी असणार आहे. हा चित्रपट क्राईम ड्रामा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळत नसल्याने पत्नीची टोकाची कृती; बीडमध्ये खळबळ

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT