Arijit Singh Viral Video Esakal
मनोरंजन

Arijit Singh Viral Video: 'कोण म्हणेल याची संपत्ती 7 मिलियन'! अरिजित स्कूटरवर निघाला किराणा घ्यायला..व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

तुम ही हो' आणि 'चाहूं मैं या ना' या गाण्याने खूप लोकप्रिय झालेला आणि आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला गायक म्हणजे अरिजित सिंग. तो बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक आहे त्याची लोकप्रियता भारताबाहेरही पसरली आहे.

तो केवळ सुमधुर गाण्यानेच नव्हे तर त्याच्या साध्या वागणुकी आणि सोज्वळ स्वभावाने देखील चाहत्याच्या मनावर राज्य करतो.

त्याने गायलेली गाणे काही क्षणातच व्हायरल होतात. त्याच्या आवाजाने तो लोकांना वेडा करतो. त्याच्या गाण्याचे ऑडिओ ऐकल्यानंतर चाहते भारावतात.

आज अरिजित हे मनोरंजन विश्वातलं खूप मोठ नाव झालं आहे. त्याच्याकडे काही संपत्तीची कमी नाही. त्याची नेटवर्थ ही 7 मिलियन डॉलरपेक्षाही जास्त असल्याचं रिपोर्ट सांगतात.

मात्र अरिजित जितका साधा दिसतो त्याच राहणीमानही तितकच साधं आहे. तो त्याच्या विनम्र आणि डाउन टू अर्थ असलेल्या स्वभावासाठी देखील ओळखला जातो. अरिजित सिंग साधं जीवन जगण्यावर विश्वास ठेवतो आणि हे त्याने अनेकदा सिद्ध केले आहे.

सध्या त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अरिजित पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये त्याच्या मूळ गावी पोहोचला आहे. त्याच्या या व्हायरल व्हिडिओत तो अगदी साध्या पद्धतीने स्कूटरवर बसून खरेदीसाठी बाहेर जाताना दिसत आहे.

स्कूटरवर किराणा खरेदीसाठी जात असलेल्या सिंगरच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये अरिजित हातात बॅग घेऊन स्कूटर चालवत किराणा खरेदी करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये अरिजित सिंग अशा वेषात आहे, ज्याला एका नजरेतही ओळखणे कठीण होऊ शकते. या व्हिडिओमध्ये अरिजित हातात बॅग घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडिओ त्याच्या आजूबाजूचे लोकही त्याच्याशी बंगाली भाषेत संवाद साधतांना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये अरिजित त्याच्या चाहत्यांना हसतानाही दिसत आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एकाने "टू डाउन टू अर्थ" अशी कमेंट केली आहे. "साधेपणाची पातळी अरिजित सिंग," तर एकानं लिहिलयं की "तो सर्वाधिक मानधन घेणारा गायक आहे."

अरिजितचा जन्म पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे पंजाबी शीख वडील कक्कर सिंग आणि बंगाली आई अदिती सिंग यांच्या घरी झाला. त्यांच्या गाण्याचे सुरुवातीचे प्रशिक्षण त्यांच्या घरातूनच झाल्याचे सांगितले जाते. अरिजितची आजीही खूप छान गाायची आणि त्याने आईकडून गाणे शिकले. गायनासोबतच आई तबलाही उत्तम वाजवते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT