Arijit Singh’s Chandigarh concert: FIR against firm for fake promotions  SAKAL
मनोरंजन

Arijit Singh: अरिजित सिंगच्या कॉन्सर्ट आयोजकांनी केला FIR दाखल, समोर आलं मोठं कारण

अरिजित सिंग सर्वोत्कृष्ट गायक आहे. संपूर्ण जगाला त्याच्या आवाजाची खात्री आहे.

Devendra Jadhav

Arijit Singh Latest Consert News: अरिजित सिंग सर्वोत्कृष्ट गायक आहे. संपूर्ण जगाला त्याच्या आवाजाची खात्री आहे. त्यांची गाणी रिलीज होताच ती लोकप्रिय होतात. तो केवळ बॉलिवूड चित्रपटांच्या गाण्यांनाच आवाज देत नाही तर लाइव्ह शो देखील करतो.

चंदिगडमध्ये त्यांची मैफल होणार होती, पण गायकाची मैफल पुढे ढकलण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला असेल. याचे कारण खराब हवामान आहे.

नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल. या कॉन्सर्टशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे की, बनावट जाहिरातीसाठी एका फर्मविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे.

(Arijit Singh’s Chandigarh concert: FIR against firm for fake promotions)

सेक्टर-34 प्रदर्शन मैदानावर होणाऱ्या अरिजित सिंग कॉन्सर्टच्या आयोजकांनी एका फर्मविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी 27 मे 2023 रोजी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, अरिजित सिंगचा २७ मे रोजी होणारा कॉन्सर्ट तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.

चंदीगडमधील खराब हवामानामुळे शो पुढे ढकलण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आता नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल.

तक्रारीवर कारवाई करून, पोलिसांनी सेक्टर 17 मधील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 419 (व्यक्तीची फसवणूक), 420 (फसवणूक) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तुम ही हो' आणि 'चाहूं मैं या ना' या गाण्याने खूप लोकप्रिय झालेला आणि आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला गायक म्हणजे अरिजित सिंग.

तो बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक आहे त्याची लोकप्रियता भारताबाहेरही पसरली आहे.तो केवळ सुमधुर गाण्यानेच नव्हे तर त्याच्या साध्या वागणुकी आणि सोज्वळ स्वभावाने देखील चाहत्याच्या मनावर राज्य करतो.

सध्या त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अरिजित पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये त्याच्या मूळ गावी पोहोचला आहे. त्याच्या या व्हायरल व्हिडिओत तो अगदी साध्या पद्धतीने स्कूटरवर बसून खरेदीसाठी बाहेर जाताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT