arjun bijlani wife
arjun bijlani wife 
मनोरंजन

'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या पत्नीला कोरोनाची लागण

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्जुनने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये उल्लेख केलाय की नेहाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याने आणि त्याच्या कुटुंबाने दोन आठवड्यांसाठी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. अर्जुन त्या सगळ्या लोकांना कोरोनाची टेस्ट करण्याची विनंती केली आहे जे तिच्या संपर्कात आले होते. यासोबतंच त्याने स्वतः स्वस्थ आणि ठीक असल्याचं देखील कळवलंय.

अभिनेता अर्जुन बिजलानीने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलंय, मित्रांनो माझ्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी आणि माझ्या कुटुंबियांना स्वतःला पुढच्या १४ दिवसांपर्यंत सेल्फ क्वारंटाईन केलं आहे. जे आमच्या संपर्कात आले होते त्यांना मी विनंती करतो की त्या सगळ्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी. आम्ही ठिक आहोत आणि मला आशा आहे की असेच राहु. तुमच्या प्रार्थना आमच्यासोबत असू देत.

यादरम्यान अर्जुनती पत्नी आणि अभिनेत्री नेहा स्वामीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना याबाबत कळवलं आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी आम्ही सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना आमच्यासोबत असू द्या.

अर्जुन आणि नेहा यांनी २०१३ मध्ये लग्न केलं. त्यांना पाच वर्षाचा मुलगा देखील आहे.  याआधी अर्जुन बिजलानीच्या इमारतीत एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. ज्यामुळे संपूर्ण इमारत सील करण्यात आली होती.     

arjun bijlani wife neha swami tests positive for covid 19 actor and his family self quarantine  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT