Arjun Kapoor emotional Post remembering late mother mona Instagram
मनोरंजन

Arjun Kapoor: 'गेल्या 11 वर्षांपासून मी...' आईच्या आठवणीत अर्जुनची हृद्य पिळवटून टाकणारी भावूक पोस्ट..

अर्जुन कपूरची आई मोना हिचं गंभीर आजारानं ११ वर्षापूर्वी निधन झालं आहे, आईच्या स्मरणार्थ अर्जुननं लिहिलेली पोस्ट सर्वांनाचा भावूक करून गेली.

प्रणाली मोरे

Arjun Kapoor: बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आपले वडील बोनी कपूर यांची खूप काळजी घेतो पण त्याबरोबरीनंच तो आजही आपल्या आईला खूप मिस करतो. अर्जुननं आपल्या आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. अर्जुनच्या आईचं ११ वर्षांपूर्वी आज २५ मार्च रोजीच गंभीर आजारानं निधन झालं होतं.

या दिवसाच्या निमित्तानं आईचं स्मरण करत अर्जुननं हृ्द्य पिळवटून टाकणारी एक भावूक पोस्ट केली आहे. आणि त्यानं आपल्या बालपणीच्या काही आठवणी देखील शेअर केल्या आहेत.

अर्जुन व्यतिरिक्त अंशुलानं देखील आपल्या आईसोबतचे लहानपणीचे फोटो पोस्ट केले आहेत.(Arjun Kapoor emotional Post remembering late mother mona)

अर्जुन कपूरनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो आपल्या आईसोबत दिसत आहे. फोटोत अर्जुन कपूर फार फार तर विशीतला असतानाचा दिसतोय. कारण यात त्याचं वजन खूप जास्त आहे. तो पुढे चालतोय आणि त्याची आई त्याच्या मागे उभी दिसतेय.

अर्जुननं तो फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''मला या गोष्टीनं फरक पडत नाही की कुणी माझ्याविषयी काय विचार करतोय..मला फक्त कायम तू माझ्या सोबतआहेस याचा भास होतो. तुझ्याशिवाय मी काही नव्हतो. या कठोर जगात मी कुणाचाही राग-रुसवा सहन करू शकतो..पण मी तुझ्या प्रेमाला खूप मिस करतोय आज''.

अर्जुन पुढे म्हणाला-''मी तुझा नुसता विचार केला तरी माझ्या चेहऱ्यावर हसू येतं. आणि तुझ्या त्या असण्यामुळेच मी कोणत्याही अवघड प्रसंगाचा सामना करू शकतो. त्यामुळे मी एक चांगला माणूस बनलो. आणि माझं मन खूप स्वच्छ राहतं''. ]

''मी तुझ्याशिवाय आजही एकाकी पडलेल्या लहान मुलासारखा आहे. मी जिथे पाहतो तिथे मला तुझा भास होतो. या फोटोत जशी तू हसतेयस..मला आशा आहे तू जिथे असशील असंच हसत असशील. लवकरच एके दिवशी आपण पुन्हा भेटू''.

तर अर्जुनची बहिण अंशुलानं देखील आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोला तिनं कॅप्शन दिलं आहे की-''११ वर्ष झाली आई..मी तुला घट्ट मिठी नाही मारली. मी तुला हसताना नाही पाहिलं. ११ वर्ष झाली तुझा हात मी हातात पकडला नाही''.

''दरवर्षी आजचा दिवस येतो आणि तुझ्याविना निघून जातो. असं वाटतं माझ्या हृद्यातली तुझी ती पोकळी वर्षागणिक मोठी होतेय. तुला हे जाणवतंय का की मी तुला खूप मिस करतेय. मी तुला प्रत्येक दिवशी मिस करते. तुला खूप खूप प्रेम. आपण कधीतरी नक्की भेटू''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : विद्या सहकारी बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

SCROLL FOR NEXT