Arjun Rampal Birthday drugs case affaire divorce lifestyle films career  sakal
मनोरंजन

Arjun Rampal Birthday: ड्रग्ज प्रकरण, घटस्फोट, अफेअर.. असं आहे अर्जुन रामपालचं 21 वर्षांचं करिअर..

नायकम, खलनायक आणि कित्येक भूमिकांना न्याय देणाऱ्या अर्जुन रामपालचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच चढउताराचे आहे.

नीलेश अडसूळ

Arjun Rampal birthday : कधी नायक तर कधी खलनायक तर कधी अत्यंत वेगळ्या धाटणीची भूमिका घेऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता म्हणजे अर्जुन रामपाल. अर्जुनच्या करियरला यंदा 21 वर्षे झाली. त्यामुळे ही वर्ष त्याच्यासाठी विशेष आहे. विशेष म्हणजे अर्जुन रामपाल 50 वर्षांचा झाला असून आज त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया या 21 वर्षात त्याला किती संघर्ष करावा लागला आणि वैयक्तिक आयुष्यात त्याने किती चढउतार पाहिले..

(Arjun Rampal Birthday drugs case affaire divorce lifestyle films career )

बॉलीवुडमध्ये दमदार अभिनेत्यांच्या फळीमध्ये अर्जुनचे नाव घेतले आहे. अर्जुनने आजवर आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याने 21 वर्षांच्या करियरमध्ये अनेक सिनेमे केले. यश, पैसा, प्रसिद्धी मिळवली पण तेवढेच चढउतारही पाहिले.

अर्जुनने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली. 1994 साली त्याची 'सोसायटी फेस ऑफ द इअर' म्हणून निवड झाली होती. मॉडेलिंगच्या क्षेत्रात यशस्वी आपले करियर केल्यानंतर त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अर्जुनने 2001 मध्ये 'प्यार इश्क और मोहब्बत' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने आजवर खूप निवडक सिनेमे केले पण जे केले त्या प्रत्येक चित्रपटातील त्याची भूमिका वाखणण्याजोगी होती.

चित्रपटात मुसफिरी करणाऱ्या अर्जुनचे वैयक्तिक आयुष्य मात्र काहीसे खडतर राहिले. मध्यंतरी अर्जुनचे नाव एका ड्रग्ज प्रकरणाशी जोडले गेले होते. त्यानंतर चौकशीसाठी एनसीबीने त्याच्या घरावर छापा टाकला होता. पुढे अर्जुनला या प्रकरणातून दिलासा मिळाला. 

अर्जुन आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला, ते म्हणजे त्याचा घटस्फोट. अर्जुनने वीस वर्षे संसार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 1998 साली मेहर जेसिया या मॉडेलसोबत त्याने लग्न केले आणि लग्नाच्या वीस वर्षानंतर 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर अर्जुन सध्या दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुनचा 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो 'नास्तिक' या आगामी सिनेमाच्या शूटिंगलादेखील सुरुवात करणार आहे.

अर्जुनने आजवर 'ऑंखे', 'इलान', 'हिरोईन', 'नेल पॉलिश', 'सत्याग्रह', 'राजनीती' अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. 'रॉक ऑन' या सिनेमासाठी अर्जुनला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. नुकताच त्याचा 'धाकड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT