Arjun Mahikaa Latest news esakal
मनोरंजन

Arjun Rampal Daughter Mahikaa : अर्जुन रामपालची लाडकी लेक 'माहिका'ही आता बॉलीवूडमध्ये येतेय?

अर्जुन रामपालच्या लाडक्या लेकीची बॉलीवूडच्या एंट्रीची बातमी आता रंगली आहे.

युगंधर ताजणे

Arjun Rampal says daughter Mahikaa : आपल्या रावडी लूकमुळे नेहमीच चाहत्यांच्या पसंतीचा विषय ठरलेल्या अभिनेता अर्जुन रामपालच्या लाडक्या (Arjun Rampal Latest News) लेकीची बातमी आता समोर आली आहे. अर्जुनची मुलगी माहिका ही देखील बॉलीवूडमध्ये येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अर्जुननं मुलीला बॉलीवूडमध्ये येण्याचा सल्ला दिल्याची (Bollywood Latest News) माहिती सुत्रांनी दिली आहे.

अर्जुन हा सध्या त्याच्या आगामी क्रॅक नावाच्या चित्रपटासाठी चर्चेत आला (Bollywood Latest news) आहे. त्यानं इंडिया टुडेशी बातचीत करताना म्हटले आहे की, मला आता तिला बॉलीवूडमध्ये पाहायचे आहे. मी तरी तिला बॉलीवूडमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. तिनंही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवावं अशी अर्जुनची इच्छा आहे.

अर्जुन हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय राहिलेला अभिनेता आहे. त्याच्या भूमिकांना चाहत्यांची मोठी पसंतीही मिळाली आहे. त्यानं आता एका मुलाखतीमध्ये लेकीच्या फ्युचर प्लॅनविषयी सांगितलं आहे. यावेळी अर्जुननं माहिकाची अभिनेत्री होण्याचं स्वप्न, तिची तीव्र इच्छाशक्ती आणि तिची अभिनयाची समज याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

माहिकाच्याबाबत सांगायचे झाल्यास ती तिच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. महिका ही माझी मोठी मुलगी आहे. तिला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे. तिला नाटकांमध्ये काम करायचे आहे. तिनं चांगलं कामही केलं आहे. मला तिच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ती आमच्या घरातील सगळ्यात मोठी एंटरटेनर असल्याचेही अर्जुननं सांगितलं आहे.

मला माझ्या लहानपणी जे वाटायचं तेच आता मुलगी माहिकाबाबत वाटते. ती सध्या आमच्या कुटूंबातील प्रमुख आकर्षण केंद्र आहे. मला तिच्याकडे पाहून वाटतं की ती अभिनेत्री होईल. अशा शब्दांत अर्जुननं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याची चर्चा होत आहे. महिकानं लंडनमधील फिल्म स्कूलमधुन शिक्षण घेतले आहे. तिला मी चित्रपट काय आणि त्याच्यातील महत्वाच्या बाबींविषयी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरून वाद! थेट सरकारला 48 तासांची नोटीस, 46 लाख दंड वसूल करण्याची मागणी

Supreme Court : श्वानप्रेमींसाठी दिलासादायक बातमी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, 'त्या' आदेशावर पुनर्विचार करण्याची...

सात वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट, पीडित कुटुंबाला धमकावणाऱ्या चौघांना अटक....मुख्य आरोपी अद्यापही फरार

गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, ३२ वर्षीय डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू; एक जण गंभीर जखमी, कारचा चुराडा

SCROLL FOR NEXT