arjun rampal daughter myra rampal became a model father shared the photo of the ramp walk post viral  Esakal
मनोरंजन

Arjun Rampal: अर्जुन रामपालच्या पोरीचा रॅम्पवर जलवा! पोस्ट शेअर करत लिहिलं, 'माझी राजकुमारी'

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल हा सध्या चित्रपटात झळकत नसला तरी तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त व्यस्त आहेत. गेल्या काही वर्षांत अर्जुन रामपालच्या कामाबद्दल कमी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चा झाली आहे.

आता पुन्हा अर्जुन रामपाल चर्चेत आला आहे. अभिनेत्याने आपल्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर करून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अर्जुन रामपाल आणि त्याची माजी पत्नी आणि माजी सुपरमॉडेल मेहर जेसियाची मुलगी मायरा रामपालने रॅम्पवर पदार्पण केले आहे.

मायराने मुंबईतील डायरच्या 2023 प्री-फॉल फॅशन शोमध्ये पदार्पण केले. आपल्या मुलीच्या या पदार्पणावर अर्जुन रामपालने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याची पोस्ट शेअर केली आहे.

त्याने मायराचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याची मुलगी रॅम्पवर वॉक करतांना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अर्जुनने मायराचे कौतुकही केले आहे. या रॅम्प वॉकसाठी मायराने गुलाबी रंगाचा आउटफिट निवडला आहे.

अर्जुनने या पोस्टला कॅप्शन देताना लिहिलयं की, “आज माझी सुंदर छोटी राजकुमारी पहिल्यांदा रॅम्पवर चालली. तेही ख्रिश्चन डायरसाठी.

ॉत्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ही चांगली गोष्ट आहे की त्याच्या मुलीने तिच्या क्षमतेच्या जोरावर हे केलं आहे. ऑडिशनपासून ते फिटिंगपर्यंत.

त्याला त्याच्या मुलीचा खूप अभिमान वाटत आहे. त्याने त्याच्या मुलीसाठी प्रेम आणि तिला यश आणि आनंदा मिळावा यासाठी प्रार्थना केली आहे. अर्जूनने त्याच्या मुलीला स्टार म्हटले. यासोबतच अर्जुनने अनेक कंपन्यांना टॅग केले आहे आणि धन्यवाद म्हटले आहे.

अर्जुन रामपालच्या मुलीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मायरा रामपालच्या फोटोला अभिनेत्याच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, 'ती अगदी तिच्या आईसारखी आहे.' दुसऱ्याने लिहिले, 'वडिल म्हणून तो उत्तम काम करत आहे.'

याशिवाय इतर अनेक चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या या पोस्टला अनेक कलाकारांनीही त्याच्या मुलीचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT