Prakash Raj Tweet: व्हायरल व्हिडिओप्रकरणी प्रकाश राज यांनी आमदाराची लाजच काढली! ट्विट व्हायरल... | Latest Marathi News | Breaking Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 prakash raj news releted

Prakash Raj Tweet: व्हायरल व्हिडिओप्रकरणी प्रकाश राज यांनी आमदाराची लाजच काढली! ट्विट व्हायरल...

त्रिपुरातील भाजप आमदार जादब लाल नाथ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विधानसभेच्या अधिवेशनात मोबाईलवर त्यांचा पॉर्न पाहण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ते पॉर्न पाहत होते, असे सांगण्यात आले.

यादरम्यान मागे बसलेल्या कोणीतरी त्याचा हा व्हिडिओ बनवला जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर बराच गोंधळ निर्माण झाला होता. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जादब लाल नाथ यांचा हा व्हिडिओ 30 मार्चचा असल्याचे सांगण्यात आले. या व्हिडिओमध्ये तो सभागृहात बसलेला दिसत असून त्याच्या हातात फोन आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच राजकीय खळबळ उडाली आहे. पण हळूहळू सेलेब्सच्या प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या. (Marathi Tajya Batmya)

या प्रकरणावर बऱ्याच स्तरावरुन प्रतिक्रिया आल्या मात्र आता प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी भाजप नेत्याच्या या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश राज हे अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया देत असतात. त्यांनी भाजप आमदाराचे हे कृत्य लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणावर प्रकाश राज यांनी नेत्याचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'ब्लू जेपी. लाज.' आता त्याचे हे ट्विट पाहून युजर्सनीही नेत्यावर टिका करण्यास सुरवात केली आहे.

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जादब लाल नाथ म्हणाले, 'हे कसं घडले ते मला माहीत नाही. मी व्हिडिओ पाहत नव्हतो. अचानक मला फोन आला. तो तपासण्यासाठी मी मोबाईल उघडला तर व्हिडीओ सुरु झाला. मी व्हिडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद व्हायला वेळ लागतो.

टॅग्स :viralActorVideo