Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades esakal
मनोरंजन

Arjun Rampal : 'मी प्रेग्नंट झाले तर तुम्हाला अडचण काय?' अर्जून रामपालच्या गर्लफ्रेंडनं झाडलं

अर्जूनच्या गर्लफ्रेंडनं ग्रॅब्रियलानं सोशल मीडियावर काही फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहेत.

युगंधर ताजणे

Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जून रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड ही आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. अर्जून हा त्याच्या वेगळ्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे देखील चर्चेत राहिला आहे. आजवर अर्जूनच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी त्याला नेहमीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.

अर्जूनच्या गर्लफ्रेंडनं ग्रॅब्रियलानं सोशल मीडियावर काही फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहेत. मात्र काहींनी प्रतिक्रिया देताना सभ्यतेची पातळी ओलांडल्याचे दिसून आले आहे. त्यांना ग्रॅबियलनं चांगलेच सुनावले आहे. ग्रॅबियल ही अर्जून रामपालच्या दुसऱ्या मुलाची आई होणार असून तिच्या या बातमीनं चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

एका युझर्सनं ग्रॅबियलला कमेंट्स करताना लिहिलं आहे की, तू बिना लग्नाची कशी काय गरोदर झालीस, तू लग्न कधी करणार आहेस, तू तर आता भारतामध्ये राहते आहेस तेव्हा तुला इकडे राहायचे असल्यास लग्न करावे लागेल. तुझ्या अशा प्रकारच्या वागण्याचा आजच्या युवा पिढीला त्रास होतो आहे. त्यांची मानसिकता खराब होत चालली आहे. त्यावर मग ग्रॅबिएलनं देखील नेटकऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. एका नव्या जीवाला जन्म दिल्यानंतर मानसिकता कशी काय खराब होते. काहीही सांगून वातावरण दुषित करण्याची सवयच आहे. मी असे केल्यानं तुम्हाला अडचण काय आहे?

अर्जून रामपाल आणि ग्रॅबियलाच्या मुलाचे नाव आहे काय?

2019 मध्ये अर्जून रामपाल आणि ग्रॅबिएलला एक मुलगा झाला होता. त्याचे नाव त्यांनी अरिक असे ठेवले आहे. अर्जूननं मेहर जेसियासोबत घटस्फोट घेतला आहे. तिला दोन मुली आहेत. अर्जून हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. एक प्रसिद्ध मॉडेल म्हणूनही तो अनेकांना माहिती आहे. हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून त्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अर्जूनच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meat Ban Controversy : स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी घालणं अयोग्य...अजित पवार स्पष्टच बोलले... महापालिकांकडून निर्णय मागे घेतला जाणार?

Akola News : उगाच खेटे घेऊ नका, ‘राधेकृष्ण’; आ. अमोल मिटकरींचा विखे पाटलांना टोला

Raigad News: अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत अंगारकी चतुर्थीला भक्तांची मांदियाळी, बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा

Latest Maharashtra News Updates Live: राज्यात पुन्हा धुवाधार! हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस अलर्ट जारी

Pune Flyover : पुण्यातील दोन उड्डाणपुलाचे उद्‍घाटन लांबणीवर

SCROLL FOR NEXT