arjun rampal  Team esakal
मनोरंजन

अर्जुन इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळतोय, गर्लफ्रेंड करतेय 'चिअर अप'

बॉलीवूडमधील (bollywood) प्रसिद्ध हिरो अर्जुन रामपाल (arjun rampal) हा त्याच्या हटकेपणासाठी प्रख्यात आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील (bollywood) प्रसिद्ध हिरो अर्जुन रामपाल (arjun rampal) हा त्याच्या हटकेपणासाठी प्रख्यात आहे. तो नेहमी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) शेयर करत असतो. आताही त्याचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. त्यात तो इंग्ल़डमध्ये क्रिकेट (england cricket) खेळताना दिसतो आहे. त्यात त्यानं क्रिकेट युनिफॉर्मही घातला आहे. हातात ग्लोव्हज घातले आहेत. पायाला पॅडही लावले आहेत. त्या फोटोंमध्येही आपण पाहू शकतो की, त्या रॉक स्टारसाठी गेम ऑन आहे. असे दिसुन येते. काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपाल हा एका वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. तो आणि वाद हे तसे जुनेच समीकरण आहे.

अर्जुननं आपले इंग्लडमधील ते फोटो शेयर करताना त्यावर कमेंटही लिहिली आहे. त्या फोटोंविषयी त्यानं लिहिलं आहे की, चार्टर हाऊस, सरे आणि क्रिकेट त्या फोटोंमध्ये त्याची गर्लफ्रेंड ग्रॅबिएला डेमेटियड्सही दिसून येत आहे. अर्जुन रामपालच्या त्या फोटोंना सोशल मीडियावरुनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. अर्जुनच्या गर्लफ्रेंडनं देखील ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तिनं लिहिलं आहे की, गेम डे.

सध्या अर्जुन हा खास सुट्टयांसाठी इंग्लंडला गेला आहे. त्याच्या समवेत त्याची मैत्रीणही आहे.त्याचं काय आहे अर्जुन हा त्याच्या बुडापेस्टमध्ये सुरु असणाऱ्या एका चित्रपटाच्या शुटमध्ये बिझी होता. त्यावेळी त्यानं त्याविषयी असं लिहिलं आहे की, सेटवर परतल्यानं मला बरं वाटत आहे. माझं सर्व काही चांगलं चाललं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT