arshad warsi comeback on television after 6 years in jhalak dikhhala jaa  SAKAL
मनोरंजन

Arshad Warsi: 'असूर' नंतर अर्शद वारसीचा नवीन प्रोजेक्ट, ६ वर्षानंतर टीव्हीवर करणार कमबॅक

अर्शद वारसी ६ वर्षानंतर टीव्हीवर कमबॅक करणार आहे

Devendra Jadhav

Arshasd Warsi News: अर्शद वारसी हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. अर्शद वारसीचं नाव घेतलं की आजही त्याची मुन्नाभाई मधील सर्कीट ही भूमिका आठवते.

अर्शदने अलीकडेच असूर या वेबसिरीजमधून स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. असूर या वेबसिरीजला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. आता अर्शद वारसीच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी. अर्शद तब्बल ६ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करतोय.

(arshad warsi comeback on television after 6 years in jhalak dikhhala jaa)

अर्शद वारसीचे 6 वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, अर्शद वारसी 6 वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक करणार आहे. तो झलक दिखलाजा या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. यााआधी अर्शद 2017 मध्ये 'सबसे बडा कलाकार' या शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये तो जजही होता.

"शोमध्ये अर्शद आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्यानिमित्ताने जजिंग पॅनल परिपूर्ण आहे. आम्ही स्पर्धकांची अंतिम यादी तयार करत आहोत. शोचा पहिला प्रोमो पुढील आठवड्यात शूट केला जाऊ शकतो."

मात्र, या वृत्ताबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अर्शद वारसी या टीव्ही शोमध्ये दिसला होता

याशिवाय अर्शद रझमताज (2001), सबसे फेवरिट कौन (2003), बिग बॉस (2006) आणि जरा नचके देखा (2010) मध्ये दिसला होता. त्याने करिश्मा और ईशान: सपनो को आवाज दो या शोमध्येही काम केले आहे.

शोच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर या यादीत अभिनेता शोएब इब्राहिमचे नाव समोर येत आहे. अलीकडेच शोएबने त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल त्याच्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली होती.

मात्र, हा प्रोजेक्ट काय आहे, हे त्यांनी सांगितले नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार शोएब झलक दिखला जा मध्ये दिसणार असल्याची बातमी आली. त्याने डान्सचा सरावही सुरू केला आहे.

अर्शद झलक दिखला जा चा जज असेल तर शोमध्ये नक्कीच धम्माल आणि रंगत निर्माण होईल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT