Radha-Sagar 
मनोरंजन

तिकीट टू बॉलिवूड...

अरुण सुर्वे

प्रीमियर - राधा सागर, अभिनेत्री
मी मूळची पुण्याची. मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे मी चौथीमध्ये असताना कथक शिकले. त्यानंतर शाळा व महाविद्यालयात असताना विविध स्पर्धांमध्येही सहभागी होत असे. मी अभिनव कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी. त्यामुळे मी फिरोदिया करंडक स्पर्धेतही सहभागी होत असे. त्यातून नाटकाची आवड लागली. हे करतानाच नृत्य व कोरिओग्राफीही करत होते. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या माध्यमातून मी रंगमंचावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘आई रिटायर होतेय’, ‘चॅलेंज’ या नाटकांत काम केलं. त्यानंतर प्रायोगिक नाटकांमध्ये काम करू लागले. त्यातून पुणे-मुंबईला वाऱ्या होऊ लागल्या.

दरम्यान, माधव अभ्यंकर यांनी मला ऑडिशन्स द्यायला सांगितल्या. त्यातून ‘एक मोहोर अबोल’ या मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळाली. छोट्या पडद्यावर पहिला मोठा ब्रेक ‘कन्यादान’ व त्यानंतर ‘चाहूल’ या मालिकांच्या माध्यमातून मिळाला. त्यानंतर मी ‘अस्मिता’, ‘जयस्तुते’, ‘लक्ष्य’, ‘गर्जा महाराष्ट्र’ या मालिकांमध्ये अभिनय केला. हे करतानाच चित्रपटांमध्येही काम करू लागले. त्यातूनच ‘एक अलबेला’ या चित्रपटात विद्या बालन यांच्याबरोबर अभिनयाची संधी मिळाली.

त्यानंतर ‘वजनदार’, ‘कंडिशन अप्लाय’, ‘ठाकरे’, ‘कुल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे, ‘नाती खेळ’ या चित्रपटासाठी मला उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकं मिळालं. भिरकीट’, ‘विकून टाक’, ‘धर्मस्य’मध्येही काम केलं असून, हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होतील. ‘धर्मस्य’मध्ये मी अबनॉर्मल मुलीची भूमिका साकारली आहे. ‘मलाल’ व फेस्टिव्हल फिल्म ‘डब्ल्यू मॅन’ या हिंदी चित्रपटांद्वारे मी हिंदू चित्रपटांतही पदार्पण केलं. माझे अनेक चित्रपट एका मागून एक प्रदर्शित होणार आहेत. मला मराठीशी नाळ न तोडता हिंदीमध्येही अभिनयाचा ठसा उमटावयाचा आहे. पुण्यामध्ये २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’मध्ये मी नृत्य सादर करणार आहे. 
शब्दांकन - अरुण सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT