मनोरंजन

65 वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी; मंत्री अमित देशमुख यांची माहिती

संतोष भिंगार्डे



मुंबई ः कोरोनामुळे सरकारने  65 वर्षांवरील कलाकार तसेच कामगार आणि तंत्रज्ञ यांना चित्रीकरणास बंदी घातली होती. त्यामुळे अनेक निर्माते व दिग्दर्शक नाराज झाले होते काही ज्येष्ठ कलाकारांनीदेखील याबाबत नाराजीचा सूर व्यक्त केला होता. परंतु आता सरकारने 65 वर्षांवरील कलाकार आणि तंत्रज्ञ व कामगार यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण चित्रीकरण बंद होते. सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली आणि हळूहळू चित्रीकरण सुरू झाले. परंतु सरकारने ही परवानगी देताना काही नियम आणि अटी घातल्या. त्यातील एक नियम असा होता की 65 वर्षांवरील व्यक्तींना चित्रीकरणात सहभागी होता येणार नाही. या नियमामुळे टीव्ही मालिकांच्या निर्मात्यांचे व दिग्दर्शकांची पंचाईत झाली होती. पण आता उच्च न्यायालयाने सदर अट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने आता ६५ वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी  होण्याची मुभा राहील अशी माहितीही श्री. देशमुख यांनी दिली आहे.  

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT