arun nalawade gives advice to young artist  sakal
मनोरंजन

हे ज्याला स्ट्रगल म्हणतात तो निव्वळ बेशिस्तपणा.. काय म्हणाले अरुण नलावडे..

सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी तरुण कलाकारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

नीलेश अडसूळ

Arun nalawade : नाटक, मालिका आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आहे. दीपूचा झालेला उपघात, इंद्राने तिच्यासाठी लावलेली जीवाची बाजी आणि या सगळ्यात बाप म्हणून दीपूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मनोहर देशपांडे अशा एकास एक संगतीने प्रेक्षक अवाक झाले आहेत. आता दीपूचे बाबा इंद्रा आणि दीपूमधील प्रेम ओळखू शकतील का, त्यांना पाठिंबा देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच निमित्ताने अरुण नलावडे सकाळ 'अनप्लग' या पॉडकास्ट मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मनातील नाराजी बोलून दाखवली. (arun nalawade exclusive interview in sakal podcast)

सध्या मोठ्या प्रमाणात तरुण पिढी मनोरंजन विश्वाकडे वळत आहे, यामध्ये अनेकांना केवळ अभिनय करायचा असतो. मग त्यासाठी नाना सायास ही तरुण मंडळी करत असतात. बहुतांशी मुलांचा मालिकेत काम करण्याकडे कल असतो. अरुण नलावडे यांनी अशा अनेक तरुण कलाकारांसोबत काम केले आहे. दोन पिढ्यांमधील स्ट्रगलमध्ये नेमका काय फरक जाणवतो, याविषयी अरुण नलावडे यांनी विचारले असता त्यांनी आपली खंत व्यक्त केली. त्यांच्या मते, 'तरुण मुलांमध्ये कमालीची ऊर्जा आहे, ताकद आहे, टॅलेंटही भरपूर आहे पण ही मंडळी समाजाकडून काहीच शिकत नाही. हे यांच्याच विश्वात रममान आहेत आणि हे ज्याला स्ट्रगल म्हणतात तो निव्वळ बेशिस्तपणा आहे. आता तो बेशिस्तपणा का तेही अरुण नलावडे यांनी सांगितले आहे, तसेच काय बदल करायला हवा याविषयीही ते बोलले आहेत. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर तुम्हाला सकाळ पॉडकास्ट ऐकावं लागेल. ज्याची लिंक खाली जोडली गेली आहे. (arun nalawade gives advice to young artist in sakal podcast interview)

या मुलाखतीच्या निमित्ताने मनोरंजन विश्वातील त्यांचे अनुभव आणि काही खटकणाऱ्या बाजू यावर अरुण नालावडे यांनी दिलखुलास संवाद साधला आहे. विशेष म्हणजे नाटक, मालिका आणि तरुण कलाकार यावर ते भरभरून बोलले आहेत. याशिवाय कलाकृती कशा असाव्यात, सामाजिक भान कसे जपावे, संस्कृतीम संस्कार याविषयीही महत्वपूर्ण संवाद त्यांनी साधला आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT