aruna irani 
मनोरंजन

..म्हणून अरुणा इराणी यांनी घेतला आई न होण्याचा निर्णय

स्वाती वेमूल

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात आणि त्यांच्या अभिनयकौशल्याची दाद देतात. अभिनेत्री अरुणा इराणी या त्यापैकीच एक अभिनेत्री आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना शिक्षण सोडावं लागलं होतं. कारण त्यांच्या वडिलांकडे मुलांच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे नव्हते. १९६१ मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून पहिल्यांदा 'गंगा जमुना' या चित्रपटात काम केलं होतं. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. हिंदी, मराठी, गुजराती अशा भाषांमध्ये त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी कधीच लग्नाचा विचार केला नाही. वयाची चाळीशी पार केल्यानंतर त्यांनी दिग्दर्शक कुकु कोहली यांच्याशी लग्नगाठ बांधली. 

"कुकुजी यांना भेटले तेव्हा मी वयाची चाळीशी पार केली होती. माझ्या एका चित्रपटाचे ते दिग्दर्शक होते. आम्ही दोघंही एकमेकांकडे आकर्षित झालो होतो", असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. कुकु यांचं लग्न झालं असून त्यांना मुलंसुद्धा होती. ही गोष्ट अरुणा यांनासुद्धा ठाऊक होती. १९६० मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि लग्नानंतर अरुणा यांनी कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला. 

या निर्णयाबाबत त्या 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाल्या होत्या. "मी जेव्हा माझ्या भाच्या आणि पुतण्यांना पाहते, तेव्हा मला मुलं नाहीत याचं समाधान वाटतं. जर माझ्या घरी पाहुणे आले आणि त्यांच्याशी माझी मुलं नीट वागली नाहीत तर मला त्याचं खूप वाईट वाटेल. माझा जवळचा मित्र डॉ. अजय कोठारी यांनी माझी खूप चांगली समजूत काढली. तू लग्न केलंस आणि जोडीदार शोधलास हे खूप चांगलं केलंस, पण तुझ्या आणि मुलांच्या वयातील अंतर तुला पुढे सांभाळायला कठीण होईल, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी जे काही सांगितलं त्याच्याशी मी पण सहमत आहे. त्यामुळेच मी आई न होण्याचा निर्णय घेतला आहे", असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

प्रेमानंद महाराजांना भेटल्यास ढसाढसा रडली पूनम पांडे, नेटकरी म्हणाले...'आधी सगळं करुन बसली आणि आता..'

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपती मुर्मूंनी घेतलं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन

Viral Video: ‘संस्कार’ म्हणजे काय ते दाखवलं! वडिलांचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

SCROLL FOR NEXT