Aruna Irani Sakal
मनोरंजन

Aruna Irani: अरुणा इराणी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर म्हणाल्या, 'आपल्या नवऱ्यांना आधी...'

अरुणा इराणी चित्रपटांमधील चमकदार अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे. चित्रपटांमधील त्यांच्या चमकदार अभिनयासोबतच त्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत.

अरुणा इराणी यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माता कुकू कोहलीशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचीही खूप चर्चा झाली होती. त्यांचा नवरा कुकू आधीच विवाहित होते. वर्षांनंतर अरुणा यांनी वैवाहिक आयुष्याविषयी सांगितले आहे.

नुकतेच अरुणा यांनी एका मुलाखतीत वैवाहिक जीवनाविषयी सांगितले आहे. विवाहित व्यक्तीशी लग्न करणे अजिबात सोपे नसते असे त्यांनी म्हटले आहे. अरुणा इराणी यांनी मुलाखतीदरम्यान आपली व्यथा मांडली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरुणा इराणी म्हणाल्या की, "एखाद्या विवाहित पुरुषासोबत अफेअर झाल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर त्या पुरुषाची पत्नी त्या महिलांना दोष देते जे तिच्या पतीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

पतीने आयुष्यभर विश्वासू राहण्याचे वचन दिलेले असते. ते वचन त्याने मोडले तर तक्रार त्याच्याकडे असावी. नवऱ्याचे अफेअर असेल तर आधी पतीला दोष द्या. यासाठी पतीला मनाई करा".

अरुणा इराणी या मुलाखतीत पुढे म्हणाल्या - घर तोडण्यासाठी मी अफेअर नाही केले. हेमा मालिनी यांचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या की, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले तर त्यांना कोणाचे घर तोडायचे नव्हते.

अरुणा मुलाखतीत पुढे म्हणाल्या- लग्नात कोणतीही सुरक्षा नसते. फक्त प्रेम प्रेम हेच संरक्षण आहे. जिथे प्रेम संपते तिथे लग्नाला किंमत नसते. अरुणा इराणी पुढे म्हणाल्या की, विवाहित व्यक्तीशी लग्न करणे अजिबात सोपे नसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: मराठवाडा हादरलं! जेलमधून सुटला अन् मध्यरात्री मैत्रिणीवर गोळीबार केला, कोण आहेत तेजा उर्फ फैजल

Latest Maharashtra News Updates : अंगारकी संकष्टीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल

Solapur News:'सोलापुरात भ्रष्ट मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन'; मंत्री माणिकराव कोकाटे, कदम अन्‌ शिरसाटांचा केला निषेध

Shivaji University Student : लेकीनं बाबा मी पोहोचले सांगितलं, थोड्या वेळात गळफास घेतल्याचा आला फोन; गायत्रीच्या आई, बाप अन् बहिणींचा आक्रोश

माेठी बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात थकली सर्वाधिक थकबाकी'; नऊ कारखान्यांकडे ८१ कोटी थकबाकी, शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT