aai kuthe kay karte, star pravah SAKAL
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: दुसऱ्या लग्नामुळे अरुंधतीला मोजावी लागणार हि मोठी किंमत, देशमुखांचा हा निर्णय

अरुंधतीचा निर्णय देशमुख कुटुंबाला मात्र तितका आवडलेला दिसत नाहीये.

Devendra Jadhav

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत नवनवीन ट्विस्ट्स अँड टर्न्स येत असतात. आई कुठे मालिकेत आता नवीन नाट्य घडणार आहे. अरुंधतीने आशुतोष केळकर सोबत लग्नाचा निर्णय घेतला आहे. अरुंधती तिच्या निर्णयावर ठाम आहे. पण अरुंधतीचा निर्णय देशमुख कुटुंबाला मात्र तितका आवडलेला दिसत नाहीये.

अरुंधतीने लग्नाचा निर्णय घेतल्यापासून अनिरुद्ध आणि कांचन अरुंधती वर नाराज आहेत. अशातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय. आशुतोषला जाणीव असते कि या वयात लग्नाचा निर्णय घेतल्याने अरुंधतीला खूप विरोध सहन करावा लागणार आहे. अरुंधतीला आता एकच बाजू निवडावी लागणार आहे. यासाठी अरुंधतीला सपोर्ट करण्याची आशुतोषची मानसिक तयारी असते.

दुसरीकडे देशमुखांच्या घरात मात्र वातावरण तापलं आहे. अनिरुद्ध अरुंधतीला सांगायला जातो. पण अरुंधती तिच्या निर्णयावर ठाम असते. कांचन आजी सुद्धा अरुंधतीच्या निर्णयावर नाराज असतात. मग शेवटी अनिरुद्ध एक मोठा निर्णय घेतो. लग्नानंतर अनिरुद्धला देशमुख कुटुंबाची दारं कायमची बंद असतील, असा ठाम निर्णय अनिरुद्ध घेतो. त्यामुळे आशुतोष सोबत लग्नामुळे अरुंधतीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आशुतोष आणि अरुंधतीची प्रेमकहाणीही पुढे सरकत आहे. आशुतोष आणि अरुंधती यांनी एकमेकांवर प्रेम मान्य केलं आहे. आता प्रेक्षकांना त्याच्या लग्नाची प्रतिक्षा आहे.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आशुतोष आणि अरुंधतीची प्रेमकहाणीही पुढे सरकत आहे. आशुतोष आणि अरुंधती यांनी एकमेकांवर प्रेम मान्य केलं आहे. आता प्रेक्षकांना त्याच्या लग्नाची प्रतिक्षा आहे. आई कुठे काय करते मालिकेचा हा विशेष भाग उद्या ३ फेब्रुवारीला ७.३० वाजता स्टार प्रवाह वर पाहायला मिळेल. मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी, ओंकार गोवर्धन, इला भाटे अशा कलाकारांच्या कुठे काय करते मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणपती मंडळांपुढे पोलिस हतबल, कार्यकर्त्यांनी भर गर्दीत उडविलले फटाके, विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Team India: करुण नायरसाठी कसोटी संघाचे दरवाजे होणार बंद? श्रेयस अय्यरबाबत 'तो' निर्णय घेत BCCI ने दिले मोठे संकेत

विसर्जन मिरवणुकीत कलाकारांना थारा नाही? DJ च्या धुमाकुळामुळे कलावंत पथकाचं वादन रद्द, चाहत्यांचा हिरमोड

Latest Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुण्यात

Satej Patil and Malojiraje : सतेज पाटील, मालोजीराजे भाजपच्या स्वागत कक्षात, राजेश क्षीरसागरांना पाहून सतेज पाटील हात पुढे करत म्हणाले, काळजी घ्या...

SCROLL FOR NEXT