Aai Kuthe Kay Karte: एकीकडे नातीचं बारस तर दुसरीकडे आजीचं लग्न... अरुंधतीसमोर प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte: एकीकडे नातीचं बारस तर दुसरीकडे आजीचं लग्न... अरुंधतीसमोर प्रश्न

Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आशुतोष आणि अरुंधतीची प्रेमकहाणीही पुढे सरकत आहे. आशुतोष आणि अरुंधती यांनी एकमेकांवर प्रेम मान्य केलं आहे. आता प्रेक्षकांना त्याच्या लग्नाची प्रतिक्षा आहे.

हेही वाचा: Nora Fatehi: "घर घेण्यासाठी माझ्याकडून पैसे अन् गाडी..", सुकेशचे नोरावर गंभीर आरोप

मात्र या सगळ्यात अनिरुद्ध हा काही शांत बसतांना दिसत नाही आहे. अरुंधतीचं लग्न होऊ न देण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. आता या मालिकेला नवीन वळण येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Salman- Aishwarya: सुभाष घईच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या राय दिसले एकत्र..नजरानजर होणार इतक्यात

मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये देशमुखांच्या घरी अभि आणि अनघाच्या मुलीच्या बारस्याची तयारी पाहायला मिळत आहे. बारस्यासाठी देशमुख कुटुंबीय जय्यत तयारी करतांना दिसतयं.

हेही वाचा: Rakhi Sawant Video Viral: 'आई आजारी तरी मी 'पठाण'वर रिल बनवणार', राखीची अजब इच्छा

या व्हिडिओत अनिरुद्ध कांचनसोबत बोलतांना दिसतोय. तो म्हणतो, 'इथे तुम्ही बारशाची तयारी करताय, पण तिकडे लग्नाची तयारी सुरु आहे.' त्यावर कांचन म्हणते, 'आता कोणाचं लग्न?' अरुंधती आणि आशुतोषचं असं अनिरुद्ध म्हणतो. ते ऐकून कांचनला धक्काच बसतो.

हेही वाचा: Pathaan रिलीज होतोय अन् चर्चा Don 3 ची रंगलीय..शाहरुख उद्या म्हणे डबल धमाका करणार..जाणून घ्या

तर दुसरीकडे अरुंधतीही तिच्या घरी आशुतोषबद्दल सांगतेय. अरुंधती अप्पांना सांगते, 'काही महिन्यांपूर्वी आशुतोषने मला लग्नाची मागणी घातली होती आणि मी आप्पा मी आशुतोषशी लग्नाचा विचार करतेय, मी आशुतोषला होकार कळवला आहे.' तिचं बोलणं ऐकल्यानंतर आप्पांच्याही चेहऱ्यांचा रंगच बदलतो.

हेही वाचा: Shah Rukh Khan Pathaan: पठाणच्या विरोधात उभे राहिले बंगाली, बंगालमध्ये शाहरुखविरोधात पेटला नवा वाद

अखेर अरुंधतीने स्वत: साठी निर्णय घेतला आणि तो स्पष्टपणे आप्पांना सांगितला आता ती बाकिच्या सदस्यांना तिचा निर्णय कधी सांगते. त्यावर घरातल्यांची आणि विशेषमध्ये कांचन आणि अभीची काय प्रतिक्रिया असेल आणि अनिरुद्ध पुढे काय करणार, याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून राहिले आहे.