Aryan Khan all set to debut on OTT ,comedy web series Google
मनोरंजन

Aaryan Khan चे OTT वर पदार्पण; कोणत्या 'भूमिकेत' ? जाणून घ्या सविस्तर

आर्यन खान एका कॉमेडी वेबसिरीजवर काम करत असून त्याची निर्मिती शाहरुखची रेड चिलीज् ही कंपनी करणार असल्याची बातमी आहे.

प्रणाली मोरे

Aryan Khan all set to debut on OTT: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानने(Aryan khan) देखील सिनेइंडस्ट्रीत दमदार एन्ट्री(Debut) केली आहे. पण आर्यन खान अभिनेता म्हणून नाही तर एका वेगळ्या भूमिकेत कॅमेऱ्याच्या मागे काम करताना आपल्याला दिसणार आहे. आर्यनने स्वतःच काही दिवसांपूर्वी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली होती. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार शाहरुखचा मुलगा आर्यन खान एका वेबसिरीजवर काम करत आहे. त्यानं वेबसिरीजच्या लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. बोललं जात आहे की या वेबसिरीजचं स्क्रिप्ट तो दोन ते तीन महिन्यात पूर्ण करेल.(Aryan Khan all set to debut on OTT ,comedy web series

मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार आर्यन खान एका कॉमेडी वेबसिरीजच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. या वेबसिरीजमध्ये एका अभिनेत्याचं स्ट्रगल दाखवण्यात येणार आहे,जो मुंबईत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करतो . चर्चा तर आहे की या वेबसिरीजची कहाणी सर्वांच्याच मनाला स्पर्शुन जाईल. सोबतच याला कॉमेडीचा भरपूर तडका असणार आहे. आर्यन खान या वेबसिरीजच्या स्क्रिप्टचे काम २०२३ मध्ये पूर्ण करणार आहे. वेबसिरीज विषयी आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे की याची निर्मिती रेड चिलीज म्हणजे शाहरुखची कंपनीच करत आहे.

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानही खूप वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुख याआधी २०१८ साली अनुष्का शर्मासोबत 'झीरो' सिनेमात दिसला होता, जो चांगलाच आपटला होता. त्या सिनेमाला आनंद एल. रायने दिग्दर्शित केलं होतं. तब्बल ५ वर्षांनी शाहरुख सिल्व्हर स्क्रिनवर दिसणार आहे. २०२३ मध्ये शाहरुख खानचे बॅक टू बॅक तीन सिनेमे रिलीज होणार आहेत. ज्यामध्ये एटलीचा 'जवान', राजकुमार हिरानीचा 'डंकी' आणि सिद्धार्थ आनंदचा 'पठाण' देखील सामिल आहेत. तुमच्या माहितीसाठी इथे नमूद करतो की याआधी रिलीज झालेले शाहरुखचे 'जब हॅरी मेट सेजल','झीरो' आणि 'फॅन' यांनी बॉक्सऑफिसवर काही फार चांगली कमाई केली नव्हती. आता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही झोया अख्तरच्या 'द आर्चीज' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आर्यन खान हा ड्रग्ज केस प्रकरणात अडकल्यामुळे वादग्रस्त चर्चेत आला होता. पण आता या सगळ्या प्रकरणातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर तो एक नवी इनिंग सुरु करतोय त्यामुळे सगळ्यांचेच त्याच्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Commission Report : दबावाखाली अर्ज माघारी? पुण्यातील बिनविरोध निवडणुकांवर आयोगाचा रिपोर्ट कार्ड

माझ्यावर ७० हजार कोटींचे आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत, भ्रष्टाचारावर अजित पवारांचं विधान

Video Viral: पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा थरार! पोलीस पांगवण्यासाठी आल्यावर थेट राष्ट्रगीत म्हटलं, शेवटी MPSC वाले म्हणतात

Vishwas Patil : ‘शासन आणि प्रशासन हेच मायमराठीचे खऱ्या अर्थाने ‘घरचे मारेकरी’ आहेत.

India vs New Zealand 2026 ODI Squad : ३ खेळाडूंनी वाढवली अजित आगरकरची डोकेदुखी! त्यांना संघात नाही घेतलं तर काय खरं नाय...

SCROLL FOR NEXT