Aryan Shahrukh Khan Aryan Shahrukh Khan drugs case
मनोरंजन

आर्यन खानसह तिन्ही आरोपी विदेशी ड्रग्स तस्करांच्या संपर्कात - NCB

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या किनाऱ्याजवळ (Mumbai coast) कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी (rave party) सुरू असताना शनिवारी NCB ने छापा मारला. या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्सचं (Drugs connection) कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. शाहरुखचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (aryan khan) पोलिसांनी अटक केली आहे. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा सुद्धा अटकेत आहे. आज त्यांना मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनसीबीच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यावेळी आर्यनसह तिन्ही आरोपी विदेशातील ड्रग्स संपर्कात असल्याचा युक्तीवाद एनसीबीच्या वकिलांनी केला.

''आर्यन खानसह तिन्ही आरोप नेहमी एका ड्रग्स तस्काराकडून ड्रग्स घेत होते. आरोपीच्या मोबाईलमधून ड्रग्ससंद्रभातील चॅट सापडले आहे. यृत्यामधून धक्कायदायक माहिती पुढे आली असून काही जणांची नावे देखील समोर आली आहेत. त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. आरोपी हे विदेशातील नागरिकांच्या संपर्कात असून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.'' त्यामुळे एनसीबीकडून तिन्ही आरोपींचा एनसीबी कोठडी मागण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद करत आर्यनला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. आर्यन कुठल्याही ड्रग्स तस्करांच्या संपर्कात नव्हता. आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही. आरबाज त्याचा मित्र असून दोघेही एकमेकांना ओळखतात, असे म्हटले आहे. आर्यनकडून ड्रग्ज खरेदी आणिविक्रीबाबत काही पुरावे एनसीबीला मिळालेले नाहीत. तसेच कुठल्याही ड्रग्ज तस्कराशी आर्यनचे काहीही संबध नाहीत. ज्या मोबाइलमधील चॅटच्या आधारे कस्टडी मागितली जात आहे, ती चुकीची आहे. आर्यनने ड्रग्स ख रेदी केलेलं नाही. तसेच त्याला ड्रग्सचं व्यसनही नाही, असा युक्तीवाद आर्यनच्या वकिलांनी केला आहे. अद्यापही या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असून युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय देतेय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अरबाज मर्चंट कोण आहे?

अरबाज मर्चंट पेशाने अभिनेता आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाचा जवळचा मित्र आहे. अरबाज आर्यन आणि सुहानासोबत अनेकदा पार्टी करताना दिसला आहे. कॉर्डेलिया क्रूझवर आर्यनसोबत अरबाजला अटक झाल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिघांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. अरबाज मर्चंट आल्या एफ बरोबर डेटींग करत असल्याच्या चर्चा होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT