Aryan khan 
मनोरंजन

Aryan Khan Drug Case: 'स्टारकिड्स देश सोडण्याच्या तयारीत'

'आर्यन खानच्या प्रकरणानंतर स्टारकिड्स चिंतेत'

स्वाती वेमूल

'आर्यन खानच्या प्रकरणानंतर स्टारकिड्स चिंतेत'

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनला Aryan Khan अटक झाल्यापासून बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्स चिंतेत असल्याचा दावा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमार आर खानने KRK केला आहे. केआरकेनं ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. 'अनेक स्टारकिड्स हे देश सोडण्याच्या तयारी असल्याची माहिती माझ्या सूत्रांकडून मिळत आहे', असंही त्याने ट्विटमध्ये म्हटलंय. केआरकेच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय आहे केआरकेचं ट्विट?

'आर्यन खानच्या प्रकरणानंतर अनेक स्टारकिड्स भारत सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती माझ्या सूत्रांकडून मिळत आहे. हे सर्व जर आर्यन खानसोबत घडू शकतं तर कोणासोबतही घडू शकेल, असा विचार ते करत आहेत', असं केआरकेने ट्विटमध्ये म्हटलंय. 'ड्रग्ज घेणाऱ्यांसाठी या देशात जागा नाही', असं काहींनी केआरकेच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय. तर अशा लोकांनी इथे आदराची अपेक्षा करू नये, असंही काहींनी लिहिलंय.

आर्यन खानच्या जामिनाला एनसीबीच्या वतीने विरोध करण्यात आला होता. आर्यनसह पाच जणांनी जामिनासाठी अर्ज केला असून आज (१३ ऑक्टोबर) विशेष एनडीपीएस न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. आर्यन सह अरबाज खान, मुनमून धनेचा, नुपूर सतेजा आणि मोहक जैस्वाल यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. एनसीबीने आर्यनवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 8 (क), 20(ब), 27, 28,29, 33 नुसार अमलीपदार्थ बाळगणे, सेवन करणे आणि विकणे असे आरोप लावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT