Aryan Khan finishes writing for maiden series, says can’t wait to say action sakal
मनोरंजन

Aryan Khan: आता अॅक्शन सुरू.. आर्यन खानच्या पोस्टनं चर्चेला उधाण..

ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेला किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन आता बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे.

नीलेश अडसूळ

aryan khan: अभिनेता शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान गेली एक वर्ष सातत्याने चर्चेत आहे. तो कोणत्या चित्रपटामुळे नाही तर ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत होता. या प्रकरणाचा शाहरुखला देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पण आता मात्र खान कुटुंबासाठी अत्यंत आनंदाची बातमी आर्यन खाननं दिली आहे. तो बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार असून त्यांचे एक फोटो शेयर करत आपल्या कामाची माहिती दिली आहे.

(Aryan Khan finishes writing for maiden series, says can’t wait to say action)

लवकरच आर्यन खान अभिनेता म्हणून नाही तर लेखक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. तेही वेबसीरिजच्या माध्यमातून तो मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. याबाबत अद्याप आर्यन काही बोलला नव्हता. पण आज त्याने चक्क एक पोस्ट करून आपल्या आगामी प्रेजेक्ट बाबत माहिती दिली आहे. 'लिखाण पूर्ण झालं असून असून आता अॅक्शन म्हणण्यासाठी उत्सुकता लागली असल्याचं' आर्यन खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

आर्यन खान नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. पुढच्या वर्षात ही वेब-सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. तर दुसरीकडे शाहरुखची लेक सुहाना जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमादेखील नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्यामुळे शाहरुखची दोन्ही मुलं 2023 मध्ये मनोरंजन विश्वात आपलं नशीब आजमावणार आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Payment New Rule: आजपासून टोलवर कॅश बंद! FASTag अनिवार्य; UPI पेमेंट पडणार महागात आणि 'हे' केल्यास दुप्पट पैसे भरावे लागणार

'४ महिन्यांपासून नाकावर कायम पट्टी का?' झी मराठीच्या 'या' नायिकेला झालीय गंभीर दुखापत, अभिनेत्री म्हणाली, 'लागल्यामुळे थोडं...'

Latest Marathi News Live Update : चिक्कमंगळूरमध्ये केरळवरुन आईवडिलांसोबत फिरायला आलेली १५ वर्षांची मुलगी बेपत्ता, पोलिसांकडून जंगलात शोध सुरु

तीन लोकांसाठी पाकिस्तान मागतोय शांततेचा नोबल पुरस्कार, शहबाज शरीफ अन् आसिम मुनीरनंतर ती तिसरा व्यक्ती कोण?

Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या पुतळ्यांवर आता मानाचे 'छत्र'! CM योगींची मोठी घोषणा; राज्यातील आंबेडकर पार्कांचेही होणार सौंदर्यीकरण!

SCROLL FOR NEXT