aryan and gauri khan
aryan and gauri khan 
मनोरंजन

आर्यनच्या सुटकेसाठी गौरी खानची 'मन्नत'

स्वाती वेमूल

नवरात्रीत गौरीची देवीकडे प्रार्थना

क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानच्या Shah Rukh Khan मुलाचा, आर्यनचा Aryan कारागृहातील मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. आर्यनने केलेल्या जामीन अर्जावरील निकाल विशेष न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे तोपर्यंत त्याला कारागृहातच रहावं लागेल. आर्यनची कारागृहातून सुटका लवकरात लवकर व्हावी यासाठी आई गौरी खानने Gauri Khan प्रार्थना केल्याची माहिती समोर येत आहे. नवरात्रीदरम्यान गौरी सातत्याने देवाकडे प्रार्थना करत असल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. नवरात्री सुरू झाल्यापासून (७ ऑक्टोबरपासून) गौरीने गोड खाणं सोडून दिलं आहे.

आर्यनसह पाच जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. २ ऑक्टोबरपासून तो अटकेत आहे आणि सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर एनसीबीने गंभीर आरोप केले असून आंतरराष्ट्रीय तस्करांशी त्याचा संपर्क होता असा दावा केला आहे. विशेष न्या. व्ही व्ही पाटील यांनी तीनही अर्ज २० ऑक्टोबर रोजी निकालासाठी राखून ठेवले आहेत.

एनसीबीने आर्यनच्या जामिनाच्या अर्जाला तीव्र विरोध केला. आर्यन मागील अनेक वर्षांपासून अमलीपदार्थ घेत आहे. त्याला या क्रुझवरील ड्रग्ज पुरवठ्याची माहिती होती आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय तस्करांचा समावेश आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील धागेदोरे तपासायचे आहेत, म्हणून कोणत्याही आरोपीला जामीन मंजूर करु नये, असा युक्तिवाद अतिरिक्त सौलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.

आर्यनला जामीन मिळेल, अशी शाहरुख-गौरीला आशा होती. मात्र एनसीबी कोठडीनंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. शाहरुख आणि गौरी सतत कारागृहात फोन करून आर्यनच्या तब्येतीची विचारपूस करत असल्याचं वृत्त आहे. आर्यनच्या तब्येतीविषयी त्यांना काळजी वाटत असून यासाठी ते दिवसातून अनेकदा फोन करत असल्याचं कळतंय. आई गौरीने मुलासाठी घरातील जेवण आणि गरजेच्या वस्तूसुद्धा कारागृहात पाठवल्या होत्या. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्या स्वीकारण्यात आल्या नव्हत्या. आर्यन एनसीबी कोठडीत असतानाही त्याच्या खाण्याची चिंता वाटल्याने गौरी बर्गर घेऊन गेली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बर्गरला नकार दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT