asha bhosle birthday : singer, cook and and asha's restaurants in all over world  sakal
मनोरंजन

आशा भोसले: गायिका, पाककलेत अव्वल आणि जगभरात रेस्टॉरंट्स; वाचा सविस्तर..

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस, जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाविषयी सविस्तर..

नीलेश अडसूळ

asha bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आवाज आणि अजरामर गाणी यांचे तर आपण चाहते आहोतच. पण त्या पलीकडेही आशा भोसले एक मोठा आदर्श म्हणता येतील. आजवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे आली, अनेक मोठे धक्के आले पण त्यातून त्या सावरल्या. केवळ सावरल्या नाही तर परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी त्यातूनही झेप घेतली. मध्यंतरी त्यांच्या ज्येष्ठ भगिनी गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन असो किंवा मुलाच्या प्रकृतीची चिंता अशा अत्यंत तणावपूर्वक वातावरणातून जाऊनही त्या स्वतःला सावरत आहेत. विशेष म्हणजे त्या कधीही थांबत नाहीत. अशा सदा प्रफुल्लित राहणाऱ्या आशाताईंचा आज वाढदिवस. आशा ताईंचे गाणे जगभरात प्रसिद्ध आहेच पण आज जाणून घेऊया त्यांच्या जगभरात पोहोचलेल्या व्यवसायाविषयी.. (asha bhosle birthday : singer, cook and and asha's restaurants in all over world)

आशा भोसले केवळ गायिका नाहीत तर त्या उत्तम सुगरण आहे. मनोरंजन विश्वात त्यांच्या हातच्या जेवणाचेही अनेक दिग्गज चाहते आहेत. अशा ताईंना गाण्याइतकेच जेवण बनवणे प्रिय आहे. त्यांनी बनवलेले कढई गोश्ट आणि बिर्याणी हे पदार्थ अनेक सेलिब्रिटींना आवडतात. एका मुलाखतीमध्ये आशा भोसले यांनी सांगितलं होतं की, जर मी संगीतक्षेत्रात काम केलं नसतं तर त्या कुक झाले असते. पण आपली जेवण बनवण्याची आवड त्यांनी व्यवसायात बदलली. आपलंही स्वतःच रेस्टॉरंट असावं असं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि सत्यातही उतरवलं. आज 'आशाज्' या नावाने त्यांची जगभरात रेस्टॉरंटस् आहेत.

त्यांचा हा व्यवसाय जगभरात पोहोचला आहे. दुबई आणि कुवेतमध्ये आशा भोसले यांचे 'आशाज' नावाचे रेस्टॉरंट आहे. तसेच आबुधाबी, दोहा, बहरीन येथे देखील आशा भोसले यांचे रेस्टॉरंट आहेत. या हॉटेल्समध्ये मिळणारे भारतीय पदार्थ लोक आवडीनं खातात. एवढेच नाही तर आशा भोसले या स्वतः या या रेस्टॉरंट्सच्या शेफना ट्रेनिंग देतात. आंतरराष्ट्रीय कूक रसेल स्कॉट यांनी 'आशा' ब्रँडच्या रेस्टॉरंट्सचे राइट्स यूकेसाठी विकत घेतले आहेत. या अंतर्गत 'आशा' या नावाने सुमारे 40 रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT