Asha Bhosle, Lata Mangeshkar 
मनोरंजन

लतादीदींच्या प्रकृतीविषयी आशा भोसले यांची प्रतिक्रिया

लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

स्वाती वेमूल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीक समदानी यांनी दिली. लतादीदींना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, मात्र त्यांचं वय ९२ वर्षे असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली. लतादीदींची बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना आशा भोसले म्हणाल्या, "मी त्यांना भेटायला गेले होते, पण रुग्णालयाच्या आत जाण्याची परवानगी मिळाली नाही. कोरोना महामारीमुळे कडक नियमांचं पालन करावं लागत आहे. पण दीदींच्या प्रकृतीत सुधारणा आहे. आधीपेक्षा त्या आता बऱ्या आहेत. उषा त्यांच्या संपर्कात असून व्हिडीओ कॉल्सद्वारे त्या आम्हाला लतादीदींच्या प्रकृतीविषयी माहिती देतात."

कोरोनातून बरं होण्यासाठी किमान सात दिवस लागतात, त्यामुळे लतादीदींना अजून रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील, असंही त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समदानी आणि त्यांचं पथक लतादीदींवर उपचार करत आहेत.

लतादीदींना कोविड न्युमोनिया झाला असून पुढील सात-आठ दिवस त्यांना रुग्णालयातच राहावं लागेल, असं डॉ. समदानी यांनी पत्रकारांना सांगितलं. लतादीदींना शनिवारपासूनच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून ऑक्सिजनची गरज भासली नाही. त्यांचं वय पाहता डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT