Ashadhi ekadashi 2023 sant tukaram movie vishnupant pagnis role was remembered last breath SAKAL
मनोरंजन

Ashadhi Ekadashi 2023: संत तुकाराम साकारून अजरामर झाले तीच भूमिका जगुन विष्णुपंतांनी अखेरचा श्वास घेतला

आषाढी एकादशी निमित्त एका सिनेमाची हटकून आठवण येते तो म्हणजे संत तुकाराम.

Devendra Jadhav

Vishnupant Pagnis Ashadhi Ekadash 2023 News: आज आषाढी एकादशी. पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आज पंढरपुरात असतील. सावळे सुंदर रूप मनोहर पाहून वारकऱ्यांना जन्माच समाधान लाभलं असेल.

विविध गावं पालथी घालत, रिंगण करत, मुखी ग्यानबा तुकारामाचा जप करत महाराष्ट्रातील तमाम वारकरी आज पंढरपुरात आनंदाचा सोहळा जगत असतील. आषाढी एकादशी निमित्त एका सिनेमाची हटकून आठवण येते तो म्हणजे संत तुकाराम.

(Ashadhi ekadashi 2023 sant tukaram movie vishnupant pagnis role was remembered last breath)

संत तुकाराम हा सिनेमा मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासातील एक नितांतसुंदर सिनेमा. दिवंगत अभिनेते विष्णुपंत पागनीस यांनी सिनेमात संत तुकारामांची भूमिका साकारली. ही भूमिका आजही अजरामर आहे. जाणकार रसिकांच्या मनात आहे.

विष्णुपंत आणि संत तुकाराम हे जणू काही एक समीकरण झालंय. विष्णुपंत हे ज्या संत तुकारामांच्या भूमिकेने प्रसिद्धी झोतात आले तीच भूमिका साकारून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाणून घेऊ..

१९३६ मध्ये 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता.

हा त्या वेळचा एक उच्चांक होता. विष्णुपंत पागनीस यांनी साकारलेली संत तुकारामांची भूमिका काळजात घर करून बसली. संत तुकाराम सिनेमाने चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा केली.

पागनीसांनी मानधन नाकारलं

संत तुकारामाने चांगला गल्ला जमवला. आता वेळ होती कलाकारांना मानधन द्यायची. जुन्या काळात सिनेमा रिलीज झाल्यावर कलाकारांना मानधन दिलं जायचं. निर्माते संत तुकारामांची भूमिका साकारणाऱ्या विष्णुपंतांकडे आले.

त्यांनी मानधनाचं पाकीट समोर ठेवलं म्हणाले, 'महाराज, हे आपलं मानधन!' चित्रपटातील तुकारामाच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना 'महाराज' म्हणत असत. पाकीट पाहून विष्णुपंत म्हणाले, 'मानधन.... ? मी घेणार नाही.'

हे ऐकताच निर्माते म्हणाले ... "महाराज, ठरल्या पेक्षा दुप्पट आहे !" विष्णुपंत म्हणाले "तरीही घेणार नाही ! आता निर्मात्यांना काही कळेना ... त्यांना वाटलं, चित्रपट इतका गाजला, चित्रपटाने जास्त धंदा केला म्हणून पंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार ..., "म्हणाले चारपट देतो... आतातरी घ्या !'.

या नंतर विष्णुपंत शांतपणे म्हणाले, "ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन कसं घेऊ? मी मानधन घेणार नाही!" निर्मात्यांनी त्यांच्या म्हणण्याला मान दिला.

शेवट सुद्धा संत तुकाराम म्हणूनच...

विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि त्या चित्रपटा दरम्यान ते तुकाराम जगले. हि भूमिका साकारल्यानंतर पागनीस जगापासून विरक्त झाले. तुकारामांचा वेष त्यांनी पागनीसांनी शेवटपर्यंत उतरवला नाही, ते शेवटपर्यंत तुकारामांच्याच वेषात वावरले.

पुढे संत तुकाराम नाटकाचा प्रयोग सुरू असताना वैकुंठगमन प्रसंगातच आपला पागनीसांनी रंगभूमीवर अखेरचा श्वास घेतला. सध्याच्या काळात पैशांच्या मागे धावणाऱ्या कलाकारांना भूमिका जगणं म्हणजे काय? हे यातून कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT