Ashish Vidyarthi Wedding Google
मनोरंजन

Ashish Vidyarthi Wedding: कोण आहे रुपाली बरुआ?.. जिच्याशी वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थींनी बांधली लग्नगाठ..

बॉलीवूडमध्ये खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आशिष विद्यार्थी यांचे रुपाली बरुआसोबत हे दुसरं लग्न आहे.

प्रणाली मोरे

Ashish Vidyarthi Wedding: हिंदी सोबतच ११ भाषिक सिनेमात काम करणारे दिग्गज अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केलं आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नावं रुपाली बरुआ असं आहे. आता लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की अखेर रुपाली बरुआ नेमक्या आहेत कोण?(Ashish Vidyarthi second marraige who is rupali barua)

रुपाली या आसामच्या राहणाऱ्या आहेत.रिपोर्ट्सनुसार रुपालीनं सांगितलं की काही दिवसांपूर्वीच त्यांची आणि आशिष विद्यार्थी यांची भेट झाली होती. ज्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

२५ मे,२०२३ रोजी कोलकाता येथे आपलं कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

जिथे एकीकडे आशिष विद्यार्थी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत,त्यांच्या नावावर २०० हून अधिक सिनेमे आहेत तिथे दुसरीकडे त्यांची दुसरी पत्नी रुपाली फॅशन जगतातील व्यावसायिका आहे. ती फॅशन डिझाइनिंग इंंडस्ट्रीशी जोडलेली आहे. रिपोर्ट्सनुसार कोलकाता इथे तिचं स्वतःचं फॅशन स्टोर देखील आहे.

आशिष विद्यार्थी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर आता रुपाली चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो देखील चर्चेत आले आहेत.

बोललं जात आहे की दोघांना पहिल्यापासून आपलं लग्न खूप साध्या पद्धतीनं करायचं होतं. लवकरच आपल्या इतर मित्रपरिवारासाठी रुपाली आणि आशिष रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करणार आहे. आशिष विषयी रुपाली म्हणाली की,''ते खूपच चांगले व्यक्ती आहेत''.

जेव्हा आशिष यांना रुपालीसोबतच्या लव्हस्टोरी विषयी विचारलं तेव्हा त्यांनी काही फार सांगितलं नाही. फक्त म्हणाले,''ही खूप मोठी कहाणी आहे,ज्याविषयी ते नंतर सांगतील'. माहितीसाठी सांगतो की आशिष यांचे पहिलं लग्न राजोशी यांच्यासोबत झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Scheme: गर्भलिंग निदानाची माहिती द्या एक लाख मिळवा; स्त्रीभ्रूण हत्यांना आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल, काय आहे खबरी योजना?

Pimpri Chinchwad: अतिक्रमणांचा विळखा; कारवाई कागदोपत्रीच, रुपीनगर अंकुश चौक मार्गाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : नाशिक- पुणे महामार्गावर सुरू असलेले हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन मागे

Mumbai News: कलिना विद्यापीठाच्या जागेचे सीमांकन करा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलणार? स्थायी समिती सभापतिपदासाठी बुधवारी चुरस

SCROLL FOR NEXT