Ashneer Grover Shark Tank Judge Father Ashok Grover Dies esakal
मनोरंजन

Ashneer Grover Father Dies : शार्क टँक इंडियाच्या अशनीर ग्रोव्हरच्या वडिलांचे निधन

शार्क टँकमध्ये आपल्या सडेतोड स्वभावामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अशनीर ग्रोव्हरच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ashneer Grover Shark Tank Judge Father Ashok Grover Dies : शार्क टँकमध्ये आपल्या सडेतोड स्वभावामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अशनीर ग्रोव्हरच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशनीरच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत अशनीर प्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

अशनीरनं इंस्टावर पोस्ट शेयर करुन याविषयी माहिती दिली आहे. त्याची ती पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अशनीर यांच्या वडिलांचे वय ६९ वर्षे होते. त्याच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आणि वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी अशनीरचे सात्वंन केले आहे. वडिलांना आदरांजली वाहिली आहे. सोशल मीडियावरुन अशनीरच्या वडिलांना सुनील ग्रोव्हर, आरजे अनमोल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अशनीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हरनं अशोक ग्रोव्हर यांचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. अशनीरनं तो फोटो शेयर करुन लिहिलं आहे की, तुम्हाला अखेरचा सलाम बाबा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. बाबा तुम्ही आता स्वर्गात असणाऱ्या मोठ्या आई, आजोबा, आजी यासगळ्यांची काळजी घ्या. अशा शब्दांत अशनीरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमृता रावचा पती आरजे अनमोलनं लिहिलं आहे की, अशनीर भावा,ही बातमी ऐकल्यानंतर आम्हाला खूपच मोठा धक्का बसला आहे. सगळ्यांसाठी त्यांचे पहिले हिरो म्हणून वडिलांचा उल्लेख करता येईल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT