ashok saraf maharashtra bhushan award how he got first marathi movie  SAKAL
मनोरंजन

Ashok Saraf: अशोक मामांना पहिला सिनेमा कसा मिळाला ? जाणून घ्या किस्सा

अशोक सराफ यांना नुकतंच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झालाय

Devendra Jadhav

Ashok Saraf Maharashtra Bhushan News: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवले. वयाची ७५ ओलांडली तरीही अशोक सराफ आजही विविध माध्यमांमधून लोकांचं मनोरंजन करत आहेत. मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अशोक मामा यांना पहिला सिनेमा कसा मिळाला? जाणून घ्या.

असा मिळाला अशोक सराफ यांना पहिला सिनेमा

अशोक सराफ यांना अभिनयाची आवज होती. ते सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर सक्रीय होते. अशातच रंगभूमीवर काम करताना अशोक मामांना स्टेट बँकेच्या नोकरीची ऑफर आली.

पुढे बँकेत नोकरी करतानाही अशोक मामांनी नाटकं आणि रंगभूमीची साथ सोडली नाही. आंतरबँक एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी पहिलं पारितोषिक पटकावलं. पुढे अशोकमामा नोकरी सांभाळत सांभाळत नाटकं करु लागले.

पुढे एका नाटकासाठी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळत असताना गजानन जहागीरदार यांनी 'दोन्ही घरचा पाहुणा' सिनेमासाठी अशोकमामांची निवड केली.

अशाप्रकारे अशोक सराफ यांना आयुष्यातला पहिला सिनेमा मिळाला. त्यावेळी सात दिवसांच्या कामासाठी मामांना ५०० रुपये मिळाले होते.

महाराष्ट्र भूषण मिळाल्यावर अशोक मामांची प्रतिक्रिया

अशोक मामांनी महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर ABP माझा ला प्रतिक्रिया दिली. अशोक सराफ म्हणाले, "मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल. मी कुठेतरी चांगलं काम करतोय. माझी आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली. मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं. हे यश माझं नाही तर माझ्या सहकाऱ्यांचंही आहे. या यशात निवेदिता माझ्यासोबत होती."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

SCROLL FOR NEXT