ashok saraf soon got padmashri puraskar cultural minister sudhir mungantiwar announced in pune  SAKAL
मनोरंजन

Ashok Saraf: प्रेक्षकांचे लाडके अशोक सराफ यांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवारांची महत्वाची घोषणा

सुधीर मुनघंटीवार यांनी अशोक मामांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस केली असल्याची आनंदाची बातमी दिलीय

Devendra Jadhav

Ashok Saraf: महाराष्ट्राचे लाडके मामा म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांना खळखळुन हसवतात.

अशोक सराफ यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. परंतु भारत सरकारच्या पद्म पुरस्कारांचा योग अजुन तर अशोक सराफ यांच्या वाटेला आला नाही. परंतु सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवार यांनी अशोक मामांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस केली असल्याची आनंदाची बातमी दिलीय.

(ashok saraf soon got padmashri puraskar cultural minister sudhir mungantiwar announced in pune)

सुधीर मुनघंटीवार यांनी केली महत्वाची घोषणा


महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवार यांनी नुकत्याच झालेल्या बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार वितरण कार्यक्रमात ही महत्वाची घोषणा केली.

सुधीर मुनघंटीवारांकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पद्म पुरस्कारासाठी नावाची शिफारस करण्याची जबाबदारी सांस्कृतिक मंत्री म्हणून सोपवली आहे. तेव्हा पासून कोणत्या कलाकारांचे नाव सुचवावे, असा प्रश्न मुनघंटीवारांना पडलाय.

पुरंदरे पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने नावाचा शोध थांबला असल्याचं, या वेळी सुधीर मुनघंटीवार म्हणाले. इतकी वर्ष लोकांच्या हृदयावर राज्य करण्याचं महाकठीण काम अशोक सराफ यांनी केले, अशा शब्दात मुनघंटीवार यांनी अशोक मामांबद्दल गौरवोद्दार काढले. त्यामुळे येत्या काही दिवसात अशोक सराफ यांना पद्म पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे

पडद्यामागील कलाकारांना अशोक सराफ यांच्याकडून प्रत्येकी ७५ हजार

काही दिवसांपुर्वी अशोक सराफ यांनी 'कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शनिवार, २९ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सन्मानसोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), हा कार्यक्रम रंगला.

या कार्यक्रमात पडद्यामागील २० कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्याकडून या कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये देण्यात आले. याशिवाय अमेरिकेत राहणारे संजय पैठणकर यांनीही १० लाखांची मदत केली.

‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ कार्यक्रम

‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या कार्यक्रमात मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता नाट्यपदे गाण्यात आली. मानसी फडके-केळकर व श्रीरंग भावे यांनी ती सादर केली. अरुण जोशी यांनी या कार्यक्रमाची स्क्रीप्ट लिहीली आहे.

अतुल परचुरे व डॉ. मृण्मयी भजक यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. ‘ग्रंथाली’च्या धनश्री धारप या कार्यक्रमाच्या संयोजिका होत्या. अशोक सराफ यांनी रंगभुमीवरील पडद्यामागील कलाकारांसाठी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. स्वतःआधी पडद्यामागच्याही कलावंताचा विचार करणाऱ्यांना अशोक मामांना पद्म पुरस्कार मिळणार असल्याचं जाहीर होताच सर्वांनी आनंद साजरा केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2025 : चाकण परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी चार जणांचा दुर्दैवी बळी

PM Modi and Emmanuel Macron: भारताचा दबदबा जागतिक पातळीवर कायम! आता मोदींची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशीही चर्चा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पावसाच्या सरी असूनही मुंबईत लाखो लोक विसर्जन मिरवणुकीत सामील

भक्ती, उत्साह आणि विरहाचा संगम! मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पुणेकरांच्या डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया’

Latest Maharashtra News Updates : इचलकरंजीत सकाळ माध्यम समुहातर्फे तंदुरूस्त बंदोबस्त उपक्रम

SCROLL FOR NEXT