Ashok Selvan get married with Keerthi Pandian Check out dreamy first official wedding pics  SAKAL
मनोरंजन

Ashok Selven Wedding: अशोक सेल्वनने केलं गर्लफ्रेंड कीर्थी पंडीयन सोबत लग्न, सुंदर फोटो व्हायरल

अभिनेता अशोक सेल्वनने गर्लफ्रेंड सोबत लग्न केलंय

Devendra Jadhav

अभिनेता अशोक सेल्वन आणि अरुण पांडियन यांची मुलगी, अभिनेत्री कीर्ती पांडियन यांचे लग्न झाले आहे.

अशोक आणि कीर्ती गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि अखेर बुधवारी एका सुंदर सोहळ्यात या दोघांनी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थिती लग्नगाठ बांधली.

(Ashok Selvan get married with Keerthi Pandian Check out dreamy first official wedding pics)

अशोक आणि किर्ती सेल्वन यांची एंगेजमेंट काही महिन्यांपूर्वी झाली होती आणि त्यांच्या लग्न सोहळ्याला फक्त जवळचे नातेवाईकच हजर होते. बालयांगोट्टई, तिरुनेलवेली जवळ इत्तेरी येथे या दोघांचा लग्न झालं.

या दोघांच्या लग्नाच्या फोटोंमध्ये अशोक आणि कीर्ती त्यांच्या पांढर्‍या आणि सोनेरी पोशाखात आकर्षक दिसत आहेत. कीर्तीने गजरा असलेली साडी नेसली होती आणि अशोक देखील त्याच्या पारंपारिक पोशाखात देखणा दिसत होता.

या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन चेन्नई येथे होणार आहे. नवविवाहित जोडप्याचे चाहते आणि चित्रपट जगतातील अनेक लोक अभिनंदन करत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंजी मोहन यांनी लिहिले, "अभिनंदन मित्रांनो." ऐश्वर्या राजेश यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले. एका चाहत्याने लिहिले, "तुमच्यासाठी खूप आनंदी आहे."

रम्या पांडियन, जी कीर्तीची चुलत बहीण आहे, तिने सोशल मीडियावर या जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी आणि आणखी काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले, "शुभ वैवाहिक जीवन माझी प्रिय, आणि आमच्या कुटुंबात तुझे स्वागत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT