MP Pradnya Singh Thakur  
मनोरंजन

आश्रम: आता भक्ती आखाड्याकडून स्क्रीप्ट वाचून परवानगी- प्रज्ञा ठाकूर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आश्रम वेब सिरीजच्या कथेबाबत बजरंग दलाने हरकत घेतली असून त्यांनी भोपाळमधील सेटवर जाऊन हल्ला देखील केला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सेटवर जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. तसेच दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाईदेखील फेकली आहे. तसेच 'आता आम्ही बॉबी देओलला शोधतोय' असं देखील म्हटलंय.

आता बजंरग दलाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत, त्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर! चित्रपटांमध्ये हिंदू धर्माचे चित्रण म्हणजे एक मोठे कटकारस्थान असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तसेच मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी या प्रकारचा प्रयत्न केला गेल्यास फिल्म निर्मात्यांना त्यांनी इशारा देखील दिला आहे. संत म्हणवून घेणाऱ्या काही व्यक्तींनी त्यांच्या घरी भेट घेऊन वेब सिरीज 'आश्रम'च्या नावाबाबत आक्षेप नोंदवला तसेच आरोप लावला की स्वातंत्र्यानंतर फिल्म निर्माते याप्रकारे विशिष्ट धर्माला बदनाम करण्यातच व्यस्त राहिलेले आहेत.

त्यावर प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटंलय की, या प्रकारचे प्रयत्न हे हिंदूत्वाच्या भावनेला मुद्दाम दुखावण्याचे कटकारस्थान आहे आणि याला थांबवायला हवं. या प्रवृत्तीला फक्त मध्य प्रदेशात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आळा घालण्यात आला पाहिजे. वास्तव असं आहे की, हे लोक आपल्याला फिल्म बघण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी भाग पाडत आहेत. देशात रहायचं असेल तर आता सनातन धर्माविरोधात असले खेळ चालणार नाहीत. साधु-संत फिल्म पाहत नाहीत मात्र आता आपल्याला भारत भक्ती आखाड्यामध्ये एक विंग बनवायला हवी, जी स्क्रीप्ट वाचेल आणि त्यात काही आक्षेपार्ह असेल तर त्या फिल्मला परवानगी दिली जाणार नाही.

पुढे त्यांनी म्हटलंय की, हे प्रकार सनातन हिंदू धर्माची बदनामी करत आहेत. याला विरोध केला गेला पाहिजे. भक्ती आखाड्यामध्ये एक वेगळी विंग अशी असेल जी या फिल्म्सना पाहिल आणि आक्षेपार्ह दृश्यांना हटवण्यासाठी काम करेल. कोणत्या आधाराव यांना शूटिंगची परवानगी देण्यात आली होती, हे जाणून घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन.

बजरंग दलाचा हल्ला

भोपाळमध्ये वेब सीरिज आश्रम -3 च्या शूटिंग दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्यासोबत त्यांनी गैरवर्तन केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. जुन्या तुरुंगात (अरेरा हिल्स) शूटिंग चालू होते. कामगारांनी तुरुंगाच्या आवारात वेब सिरीज टीमच्या कर्मचाऱ्यांना धावून मारहाण केली. व्हॅनिटी व्हॅनसह 5 वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात ४ ते ५ कर्मचारी जखमी झाले. काही पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कामगारांना पांगवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT