Ashutosh Rana, Rajkumar Rao Esakal
मनोरंजन

Ashutosh Rana Birthday: अन् आशुतोष राणांनी राजकुमार रावच्या कानाखाली मारली..,असं काय घडलं

'द कपिल शर्मा' शो मध्ये 'भीड' सिनेमाची टीम प्रमोशन निमित्तानं आली होती तेव्हा शूट दरम्यानचे अनेक खुलासे कलाकारांनी कपिलसमोर केले.

प्रणाली मोरे

आज बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार आशुतोष राणा यांचा वाढदिवस. आशुतोष यांनी आजवर अनेक सिनेमांंमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं.

आशुतोष राणा यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास किस्सा आम्ही सांगणार आहोत. जेव्हा आशुतोष यांनी राजकुमार रावच्या कानाखाली मारली होती. अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भीड़' सिनेमाच्या सेटवर हा किस्सा घडला. सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं 'द कपिल शर्मा शो' मध्ये 'भीड़' सिनेमाची टीम नुकतीच गेली होती.

'द कपिल शर्मा शो' मध्ये गेल्यावर कपिल शर्मानं 'भीड़' सिनेमाच्या टीमला संबंधित अनेक प्रश्न विचारले आणि सर्वांनीच या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक सीन आहे,ज्यात आशुतोष राणा राजकुमार रावच्या कानशिलात लगावतात.

राजकुमार रावनं खुलासा केला की शूट करताना आशुतोष राणा यांनी त्याच्या खरोखरची कानाखाली मारली होती. पण असं का केलं होतं आशुतोष राणा यांनी?(Ashutosh Rana Slapped Rajkumar Rao during shooting bheed)

थप्पड वाल्या सीनचा उल्लेख करताना शो दरम्यान कपिलनं राजकुमार रावला प्रश्न केला की त्याच्या मनात हा प्रश्न तेव्हा उठला होता का की दिग्दर्शक अनुभव सिन्हानं तर आशुतोष राणांना आपल्याला खरोखरची कानाखाली मारायला सांगितलं नसेल ना. कारण आशुतोष राणा एखादी भूमिका साकारताना त्याच्यात पूर्णपणे स्वतःला झोकून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर अनुभव सिन्हा रिअॅलिस्टिक पद्धतीनं सिनेमा शूट करण्यासाठी ओळखले जातात.

हेही वाचा: अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

कपिलच्या हे असं विचारण्यावर राजकुमार राव म्हणाला की,''आशुतोषनी त्याला खरोखर श्रीमुखात लगावली होती''. त्यावर आशुतोष राणा म्हणाले,''मी मारत नव्हतो पण राजकुमार राव इतका ईमानदार अभिनेता आहे की त्यानं स्वतः मला त्याला मारायला सांगितलं. मी खरंतर नाहीच म्हणत होतो पण राजकुमार म्हणाला की,सर मारा मला''.

आशुतोष राणा पुढे म्हणाले की,''तेव्हाच दिग्दर्शक अनुभव सिन्हा आले आणि म्हणाले,'जर तो म्हणतोय मला मारा..तर मग मारा..'आणि असा तो ट्रेलरमध्ये दिसलेला सीन शूट झाला होता''.

भीड सिनेमा २४ मार्च रोजी रीलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT